शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

६६० मेगाव्हॅट क्षमतेच्या वीज प्रकल्प संचाचे 'बाष्पक प्रदिपन' यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 20:02 IST

दीपनगर प्रकल्पात सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा कार्यान्वीत

कुंदन पाटील

जळगाव : दीपनगर महानिर्मितीच्या वीज प्रकल्पात  ६६० मेगाव्हॅट स्थापित क्षमतेच्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित  संच क्रमांक ६ चे 'बाष्पक प्रदीपन' ३० मार्च २०२३ रोजी सकाळी  संचालक(प्रकल्प) अभय हरणे यांच्या हस्ते नियंत्रण कक्षातून कळ दाबून यशस्वीरीत्या बाष्पक प्रदिपन पूर्ण करण्यात आले.  यावेळी मेसर्स भेल कंपनीचे महाव्यवस्थापक  दिनेश जवादे, वीज केंद्राचे मुख्य अभियंता विवेक रोकडे, मोहन आव्हाड उपस्थित होते. 

महानिर्मितीचा ६६० मेगावाट क्षमतेचा हा चवथा संच आहे. यापूर्वी कोराडी येथे प्रत्येकी ६६० मेगावाटच्या तीन संचांतून वीज उत्पादन सुरू आहे.  चंद्रपूर २९२० मेगावाट, कोराडी २१९० मेगावाट नंतर आता भुसावळ १८७० मेगावाट हे महानिर्मितीचे तिसरे मोठे वीज उत्पादन केंद्र म्हणून साकारणार आहे.  २० फेब्रुवारी २०२३ रोजी  महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अन्बलगन यांनी  प्रकल्प स्थळी पाहणी करून प्रगतीपर कामांचा आढावा घेतला होता आणि बैठक घेऊन  कामांना अधिक वेग देण्याचे निर्देश दिले होते. बाष्पक प्रदिपनप्रसंगी उप मुख्य अभियंते आर.एम. दुथडे, संतोष वकरे, प्रशांत लोटके, मनोहर तायडे, अधीक्षक अभियंते महेश महाजन,किशोर शिरभैय्ये, मनिष बेडेकर,योगेश इंगळे,पराग आंधे, राजु अलोने,सुमेध मेश्राम,सुनील पांढरपट्टे, महेंद्र पचलोरे,अतुल पवार, एस. एस. देशपांडे, कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ राजेश चिव्हाणे,कल्याण अधिकारी पंकज सनेर, सुधाकर वासुदेव प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव