शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

विविध प्रदेशांना आपल्या अंत:करणात सामावून घेणारा वाल्मीकी-व्यासांचा खानदेश

By admin | Updated: May 2, 2017 13:54 IST

वीकेण्ड या सदरात प्रा.डॉ.विश्वास पाटील यांनी खान्देशातील संतांची मांदियाळी या विषयावर केलेले लिखाण.

 खानदेशच्या अर्थ आणि अर्थाच्या व्याप्तीच्या संदर्भात नाना मते आहेत.  कुणाला वाटते हा कान्हाचा देश तर कुणी म्हणतो खानांचा देश. इतिहासाचा अभ्यास करणा:या विद्याथ्र्यासाठी मात्र हा कान्हाचा - आभिरांचा देश तसेच हा फारूकी घराण्यातील खानांचाही देश ठरतो, अशी समन्वयात्मक भूमिका खानदेशच्या नावाच्या संदर्भात तर आढळतेच पण इथल्या वैविध्यपूर्ण संत साहित्याच्या संदर्भात विचार करून जाताही असे ठळकपणे ध्यानात येते. इथे नाना धर्म-मत-पंथ-संप्रदायांच्या सिद्धांताचे प्रवाह आनंदाने एकत्र नांदले. हिंदू वा मुसलमान अशाप्रकारे कुठलाही अभिनिवेश मनी न बाळगता ही संत परंपरा विकसली. नाही तरी संतांच्या अंगणात मानवी धर्माचेच जयगान असते. खानदेशही याला अपवाद नाही. असा हा खानदेशचा प्रदेश विविध धर्म मतांच्या गलबल्याला आपल्या अंत:करणात सामावून घेणारा आहे. उत्तरेला सातपुडा, दक्षिणेला सातमाळा किंवा अजिंठा, पूव्रेकडे हत्ती टेकडय़ा, पश्चिमेला सह्यगिरी, पूव्रेस राजे भोसले तर पश्चिमेला गायकवाड, उत्तरेला होळकर तर दक्षिणेला निजाम अशी राज्य व्यवस्था आहे. या भूमीला सहजच समन्वयात्मक असण्याचा एक निसर्गदत्त आशीर्वाद लाभला आहे. 

चाळीसगाव नजीक पिंपरखेड - वालङिारी येथे वाल्मीकी ऋषी राहत असल्याचे उल्लेख येतात. येथून जवळच असलेल्या रांजणगावचे रांजण आजही दाखवले जातात. अमळनेर हे नाव अंबा ऋषीच्या समाधीवरूनच पडले आहे. खरे तर अंबा काय आणि नेर म्हणजे नीर काय या दोन्हीही शब्दांचा अर्थ पाणी असाच होतो.  उनपदेव येथे शरभंग ऋषींचा आश्रम होता. खानदेशात अनेक ठिकाणी असे उनपदेवचे ठाणे आहे. जळगावजवळ रामाला उष्टी बोरे देणा:या शबरीचे स्थान आहे. महाभारताची रचना व्यास महर्षीनी केली. ‘व्यासोच्छिष्टं जगत र्सव’ व्यास प्रतिभेने सारे जग उष्टे केले याचा अर्थ असा की आता जगाला नवीन असे काहीही सांगायला जागा नाही, अशा व्यासांची यावल ग्रामी समाधी आहे. कण्वांचा आश्रम कानळदा येथे आहे. एकचक्रानगरी म्हणजे सध्याचे एरंडोल, येथे पांडवांचा वाडा आहे. भीम बकासुराच्या युद्धाच्या खुणा आणि भात सांडल्याची जागा दाखविली जाते. तिकडे तळोद्याजवळ हिडिंबेचे वन आहे. पद्मालयाला गणेशाच्या अडीच पिठांचे स्थान आहे.  सातपुडय़ात सीताखाई आहेच. तिथेच नाथ पंथियांच्या विविध समाध्यांमध्ये कंथडीनाथांची समाधी विशिष्ट अशी आहे.
चाळीसगावचे जनार्दन स्वामी हे एकनाथ महाराजांचे सद्गुरू होते. शके 1426 साली त्यांचा जन्म झाला. काही ऋणानुबंधांमुळे त्यांना यवन राजाच्या दरबारी नोकरी करावी लागली. पुढे देवगड वा दौलताबाद येथे ते बढतीवर गेले. ते मोठे वीर, दृढ स्वभावाचे, नियमित आणि तेजस्वी पुरुष होते.  बादशहाचे विश्वासपात्र म्हणून त्यांची ख्याती होती. हे गुरू दत्तात्रयांचे उपासक होते. उपास्यदेवतेचे साक्षात दर्शन त्यांना झाले होते. आपले काम प्रामाणिकपणे पूर्ण करून ते रात्री ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथांवर प्रवचने देत असत. प्रपंच आणि परमार्थातील संतुलन त्यांनी राखले होते. एकनाथांनी सहा वर्षार्पयत निष्ठापूर्वक गुरूसेवा केली, अनुग्रहाला पूर्ण प्राप्त झाले. 
 मुक्ताईनगर येथे मुक्ताबाई आणि चांगदेव आहेत. पाटणा येथे गणिततज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्याचे ठाणे आहे तर कण्हेर डोंगरावर  कण्हेर स्वामींची समाधी आहे.  जामनेरमार्गे सावळतबा:याचे सूर्यमंदिर, यावलला महालक्ष्मी मनुदेवी, फरकांडे येथे चांद मोमीनचे हलते मनोरे, शहाद्याजवळ मुसा सुहागीची कबर, गरंधीपु:यात ब्रrादेवाची तपोभूमी तर एरंडोलच्या जुन्या विठ्ठलवाडीत संत निवृत्तीनाथांच्या पादुका आहेत. पद्मालयाचे गोविंदबुवा आहेत तर भुसावळजवळ कपिलेश्वर कंदार्क नामक संत कवी उदासी उपाख्य बाबा प्रयागदासांचे शिष्य होते.
चाळीसगावचे आत्मारामस्वामी शिंदखेडकर, सदानंद स्वामी, वाडे तालुका चाळीसगाव येथील पंचोपाख्यानकर्ता महालिंगदास, तांदूळवाडीचा वह्याकर्ता चांग सुलतान, पिंपळनेर परिसरातील दीपर}ाकरकर्ते र}ाकर स्वामी सदावर्ते, शिरुडचे ‘अनुभवोदय’ हा वेदांतपर ग्रंथ लिहिणारे माधवेंद्र, श्रीधरशास्त्री पाठक उपाख्य स्वामी शंकरानंद भारती यांचे नाव विशिष्ट आहे. श्री ङोंडुजी महाराज वेळुकरांनी सन 1833 साली पंढरपूर येथे वारकरी संप्रदायात दीक्षा घेतली. एदलाबाद कोथळी येथे येऊन संत मुक्ताईच्या समाधी मंदिराचे संशोधन करून तेथील स्वयंभू मूृर्तीची प्राणप्रतिष्ठा करवली. दरवर्षी पुण्यतिथी यात्रेस आरंभ केला. त्यानंतर त्यांचे शिष्य श्री धनजी महाराज भुसावळकर यांनी सेवा केली.  या परंपरेत सर्वश्री नागोजी महाराज तळवेलकर, मुकुंद महाराज एणगावकर, तोताराम महाराज गाडेगावकर, ङोंडुजी महाराज आसोदेकर, राजारामशास्त्री शेलगावकर, मोतीराम महाराज एणगावकर, काशीराम महाराज आडविहीरकर, जगन्नाथ महाराज अंजाळेकर, लक्ष्मणबुवा कुंडकर, दिगंबरबुवा चिनावलकर, विठ्ठलबुवा हंबर्डीकर, निवृत्ती महाराज देशमुख शेलगावकर, खुशाल तोताराम पाटील दूधलगावकर, शंकरराव कोलते पाटील डिधीकर, निवृत्ती भाऊ बोंडे एणगावकर, गोविंदबुवा बोंडे एणगावकर या वारकरी संप्रदायातील  संतांनी काम केले. हे काम केवळ धार्मिक स्वरूपाचे नसून त्याला सामाजिक संदर्भ आणि मानवीय संवेदनांचा पोत आहे.
- प्रा.डॉ.विश्वास पाटील