चोपडा : तालुक्यातील वेले येथील यशवंत रघुनाथ पाटील (वय ३०) या युवकाचा रत्नावती नदीच्या डोहातील पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची दुर्घटना १ रोजी घडली.याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, १ रोजी संध्याकाळी ७ वाजेपूर्वी वेले येथे रत्नावती नदीच्या डोहात असलेल्या पाण्यात बुडून यशवंतचा मृत्यु झाला. ही घटना लक्षात येताच त्यास नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉ. तृप्ती पाटील यांनी मृत घोषीत केले. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक प्रदीप राजपूत हे करीत आहेत.
रत्नावती नदीत बुडून वेलेच्या युवकाचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 23:17 IST