शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

 जळगावात पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी कॉडलेस इअर फोनचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 17:22 IST

पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी कॉडलेस इअर फोनचा वापर करण्याचा प्रयत्न करणा-या मदन महाजन डेडवाल (वय २१ रा.जोडवाडी, पो.कचनेर, ता.जि.औरंगाबाद) या तरुणाला गुरुवारी सकाळी पावणे सात वाजता पोलिसांनी कवायत मैदानावरच पकडले. मदन याला मदत करणारा रतन प्रेमसिंग बहुरे (रा.जोडवाडी, पो.कचनेर, ता.जि.औरंगाबाद) हा तरुण फरार झाला आहे.

ठळक मुद्देतोतयेगीरीचा प्रयत्न फसला   औरंगाबादच्या तरुणाला अटक दुसरा साथीदार फरार

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१९ : पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी कॉडलेस इअर फोनचा वापर करण्याचा प्रयत्न करणा-या मदन महाजन डेडवाल (वय २१ रा.जोडवाडी, पो.कचनेर, ता.जि.औरंगाबाद) या तरुणाला गुरुवारी सकाळी पावणे सात वाजता पोलिसांनी कवायत मैदानावरच पकडले. मदन याला मदत करणारा रतन प्रेमसिंग बहुरे (रा.जोडवाडी, पो.कचनेर, ता.जि.औरंगाबाद) हा तरुण फरार झाला आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस भरती प्रक्रियेचा अंतिम टप्पा म्हणून गुरुवारी लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सात वाजता प्रत्यक्ष पेपर सुरु होणार असला तरी साडे पाच वाजेपासून उमेदवारांना बोलावण्यात आले होते. प्रत्येक उमेदवारांची अंगझडती घेतल्यानंतर डोअर फ्रेम मेटर डिटेक्टरमधून तपासणी केल्यानंतर मैदानावर पेपरसाठी सोडले जात होते. तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक रत्नपारखी, अपर पोलीस अधीक्षकांचे वाचक सहायक पोलीस निरीक्षक गोरखनाथ गांगुर्डे, कॉन्स्टेबल विजय कचरे व अशपाक शहा यांची गेट क्र.१ वर ड्युटी होते. पावणे सात वाजता मदन डेडवाल हा तरुण घाईगडबडीत धावत आला व गेटवर असलेल्या पोलिसांशी पूर्ण तपासणी न होऊ देता घाई करुन आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करु लागला तेव्हा त्याचे बींग फुटले. मदन याची अंगझडती घेतली असता उजव्या हाताच्या दंडावर काही तरी कडक व चौकोनी वस्तू जाणवली. शर्ट काढल्यानंतर एक कॅलक्युलेटरसारखे चिकटपट्टीने चिकटविलेले इलेक्ट्रॉनिक यंत्र आढळून आले. या यंत्रात मोबाईलचे सीमकार्ड होते. तर कानात कॉडलेस इअर फोन आढळून आला. हे यंत्र अतिशय बारीक असून लक्षात येण्यासारखे नाही.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा