शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

अगडबंब प्लेट- लाँंचमधील जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:47 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत शेजारच्या देशात या सदरात लिहिताहेत बांगला देशात प्रवास करून आलेले जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार अनिलकुमार शाह... लेखमालेचा आज चौथा भाग...

बांगला देशातील प्रवासा दरम्यान आम्ही आॅर्डर दिल्याप्रमाणे वेटरने दाल-भात आणले. त्यातली भाताची प्लेट आणली. ती पाहून मी थक्कच झालो. एक भाताची किंवा ‘खिचरी’ची प्लेट म्हणजे एकात पाच-सहा लोक जेवतील अशी अगडबंब. प्लेट चांगली दोन वीत लांब, दीड वीत रुंद आणि त्यात वितभर उंच भाताचा ढीग. दहा प्लेट ‘खिचरी’चे काय झाले असते. त्याचा मी फक्त विचारच करीत राहिलो. पण सोबतच्या लोकांना भात खाताना पाहून मात्र चाट पडलो. पाचही बोटांनी मूठ वळून ते भात कालवतात. त्यात कालवायला काही हवेच असेही नाही आणि तो मोठमोठे गोळे करून पाचही बोटांनी असा काही वेगात खातात की ती अगडबंब प्लेट एक माणूस अगदी दहा मिनिटातच सहज खाऊ शकतो, याची अजिबात शंका माझ्या मनात उरली नाही. पुलंच्या ‘वंगचित्रे’मध्ये बंगाली माणसाच्या खाण्याचे वर्णन माझ्यासमोर अक्षरश: ‘खाबो’ताना मी पाहत होतो.मी मात्र त्यांच्या मानाने अगदीच कच्चा लिंबू होतो. मी दोन वेळा थोडाथोडा भात घेतला. त्यापेक्षा कितीतरी जास्त त्यांनी एकदाच घेऊन माझा पहिला संपायच्या आत संपवलासुद्धा. मी कधी दाल तर कधी ‘मिक्शवेज’ कालवून खात होतो ते त्यांना फारच अडाणीपणाचे वाटले असावे. त्यांनी सगळे सामिष भोजन आणि भातही माझ्या कितीतरी आधी संपवले. मी त्यांच्या मानाने खूपच हळू जेवतोय हे पाहून उगीचच माझे मलाच अपराधी वाटून गेले.खाण्याच्या पदार्थांचा आकार सगळ्याच बाबतीत चांगला जम्बो. पुढे नारायणगंजला तिथले ‘रोशोगुल्ला’ आणि गुलाबजाम प्रसिद्ध म्हणून समोर आले. एकेक चांगले मोसंबी एवढे. खव्वय्ये असे म्हणतात की ‘रोशोगुल्ला’ अंगठा आणि तर्जनी यात धरावा आणि अख्खाच्या अख्खा तोंडात टाकावा. समोर आलेला हा खास बंगाली आकाराचा मात्र मला या जन्मात तरी तसा खाणे जमणार नाही.जेवणात मात्र एक नवीनच गोष्ट केली. तिथले लिंबू, पिळण्याऐवजी खाल्ले! त्यात काय एवढे? तर लिंबू चांगले मोठे, जाड सालीचे. लंबगोलाकार. उभी फोड, अंगठा आणि तर्जनीत धरून पिळायला अवघड इतकी मोठी आणि जरा कडकच. तीन इंच तरी लांब. पण पिळण्याऐवजी सालीसकट थोडीथोडी फोड खायची! साल चांगली खोबऱ्यासारखी चवदार आणि अजिबात आंबट नाही.लिंबू भातावर पिळण्याऐवजी फोड थोडीथोडी खात लिंबाचा आस्वाद घेतला. बंगालीत त्याला ‘शतकोरा’ किंवा ‘लेबू’ म्हणतात. आम्ही लहानपणी झेंडूच्या फुलातले खोबरे खायचो किंवा कमळाच्या देठातून त्याच्या हिरव्या कच्च्या बिया सोलून कधीकधी खाल्ल्या त्याची आठवण झाली.२८ जानेवारी २०१९ ला, रात्री बरोब्बर नऊ वाजता एमव्ही अ‍ॅडव्हेन्चर-९ निघाली. लॉन्चची घरघर मी प्रथमच अनुभवत होतो. त्यात केबिन आणि एकूणच व्यवस्था अपेक्षा केली त्यापेक्षा खूपच छान मिळाली. रात्री छान गरम दाल-भात-भाजीचे जेवण मिळाले हा अत्यानंद होता. गरम ‘चॉ, कोफी’ मिळाले हा आणिक दुसरा आनंद होता. तर जेवल्यावर फळे हा अनपेक्षित बोनस ! (क्रमश:)-सी.ए. अनिलकुमार शाह, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव