शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फेरा सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 21:31 IST

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फेरा सुरुच आहे.

अमळनेर/भडगाव/पहूर : अमळनेर, भडगाव, पहूरसह परिसरात अवकाळी पावसाचा फेरा कायम आहे. खरीप हंगाम तर हातून गेला, त्यानंतर आता रब्बी हंगामावरही पाणी फिरणार असल्याचे चित्र आहे.भडगाव तालुक्यात ७ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास  वादळासह जोरदार पाऊस झाला. यात गव्हासह पिकांचे काही प्रमाणात आडवे पडून नुकसान झाले आहे. तसेच ८ रोजीही रात्री व सकाळीही अवकाळी पावसाची तुरळक हजेरी सुरुच होती. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहु, हरभरा, ज्वारी, मका यासह पिकांचे जास्त नुकसान होते की काय, या चिंतेत शेतकरी सापडला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळातच अवकाळी पावसाने वेळोवेळी थैमान घातल्याने शेती पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. सध्या पावसाचे वातावरण असल्याने शेतकरी चिंतातूर बनला आहे. भडगाव निवासी नायब तहसीलदार रमेश देवकर यांचेशी संपर्क साधला असता भडगाव तालुक्यात पीक नुकसान झाल्याचे कुठलीच माहिती प्रशासनास मिळाली नाही, असे सांगितले.पहूर परिसरात शेतकऱ्यावर संकटपहूर, ता.जामनेर : पहूरसह परिसरात अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. यात शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढवले आहे. पहूरसह पररिसरात मोठ्या प्रमाणावर गहू हरबरा, ज्वारी, बाजरी पिकांची लागवड झाली आहे. याचबरोबर भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. अवकाळी पावसाने शुक्रवारी हजेरी लावल्याने या पिकांना फटका बसला असून, भाजीपाला उत्पादक ही संकटात सापडला आहे. झालेल्या पाऊसाने पहूर सह परीसरातील   पिंकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव