घरातील दु:खद घटना दर्शविणा-या ‘उलटा मांडव’ची अनोखी परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 01:11 PM2018-01-17T13:11:04+5:302018-01-17T13:17:50+5:30

ग्रामीण भागात आजही परंपरा कायम

The unique tradition of 'Ulta Mandhav' showing the sad events | घरातील दु:खद घटना दर्शविणा-या ‘उलटा मांडव’ची अनोखी परंपरा

घरातील दु:खद घटना दर्शविणा-या ‘उलटा मांडव’ची अनोखी परंपरा

Next
ठळक मुद्देमृतकाच्या दारात उलटा मांडवअंत्यविधीचे विविध सोपस्कार

मतीन शेख / ऑनलाईन लोकमत

मुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. 17-  : भारतीय संस्कृती विविध चालीरीती व परंपरांनी नटलेली आहे. देशात विविध धर्मासह हजारो जातींचे लोक एकोप्याने वास्तव्यास आहे. अशात अनेक चाली रीती व परंपरेचे साम्य प्रामुख्याने उमटून येतात. यात आनंदाच्या प्रसंगी शामियाना वजा मांडव सजावटीचा तर दु:खद प्रसंगी आजही  ग्रामीण भागात मृतकाच्या दारात उलटा मांडव टाकण्याची प्रथा पहावयास मिळते
धर्म व विविध जाती तशा चालीरीतीनुसार अंत्यविधी कार्ये आपल्याला पहायला मिळतात. त्यात प्रामुख्याने हिंदू धर्मात अग्नीडाग देत  तर मुस्लीम धर्मात दफनविधीने अंत्यविधीचे विविध सोपस्कार पार पाडले जातात. काही चालीरीती धर्मग्रंथानुसार व धर्म शास्त्र नुसार तर काही जुन्या चालीरीतीने व परंपरेने पार पाडल्या जातात.
त्याचाच एक भाग अगदी सर्व ठिकाणी साम्य स्वरूपात दिसून येतो तो मृतकाच्या अंगणात दु:खाचे प्रतीक म्हणून ‘उलटा मांडव’ टाकण्याची प्रथा वजा परंपरेचे आजही पालन होते.  या बाबत विचार केल्यास उलटा मांडव टाकण्याचे कुठेच  प्रमाण दिसून येत नाही. परंतु दु:खाचे प्रतीक म्हणून आजही ग्रामीण भागात मृतकाच्या दारात उलटा मांडव टाकलेला दिसून येतो. अर्थात उलटा मांडव पाहून प्रथम दर्शनी संबधित घरात दु:खद घटना घडली याचे प्रतीक व्यक्त करण्याचा हा संकेत मानले जाते

ज्या ठिकाणी दु:खद घटना घडली असेल तेथे संबंधितांच्या मागणी प्रमाणे उलटा मांडव टाकला जातो. प्राथमिक दृष्या याठिकाणी दु:खद घटना घडल्याचा हा ‘सिम्बॉलीक’ प्रकार होय
- रमेश कापले, संचालक,  टेंट हाऊस, मुक्ताईनगर

Web Title: The unique tradition of 'Ulta Mandhav' showing the sad events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.