शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंनी कमावलेली प्रतिष्ठा गमावली; महाविकास आघाडीचा देशात मोठा अपमान- रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 09:39 IST

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली आहे.

जळगाव- संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपानं विजय मिळवला आहे. भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी या जागेवर विजय मिळवत शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे. राज्यसभेच्या सहा जागांपैकी महाविकास आघाडीचे दोन तसेच भाजपाचेही तीन उमेदवार विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी भाजपाच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे. या सहाव्या जागेवर अत्यंत चुरशीची लढत झाली. यामध्ये महाडिकांनी बाजी मारली. 

महाविकास आघाडीचा पराभव केल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज्यसभेच्या एका जागेवर झालेल्या पराभवामुळे उद्धव ठाकरे यांनी सत्तेतून बाहेर पडावं आणि राजीनामा द्यावा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. तसेच लोकशाहीमध्ये एका मताला हे फार मोठं महत्व असतं. एका मताने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकारचा देखील पराभव झाला होता, असं रामदास आठवले म्हणाले. 

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. या पराभवामुळं महाविकास आघाडी सरकारची मोठी नामुष्की झाली आहे. उद्धव ठाकरेंनी फार मोठी प्रतिष्ठा कमावली होती. परंतु या निवडणुकीमुळे त्यांची प्रतिष्ठा त्यांनी गमावले आहे.  महाविकास आघाडीचा पूर्ण देशांमध्ये मोठा अपमान झाला आहे, अशी प्रतिक्रिया रामदास यावेळी दिली. रामदास आठवले रविवारी मुक्ताईनगर येथे प्रसिद्ध गायक स्वर्गीय प्रतापसिंग बोदडे यांच्या अभिवादन सभेसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

मुख्यमंत्री अपक्षांना भेटत नाहीत- देवेंद्र भुयार

मी महाविकास आघाडीचा घटक आहे आणि राहीन. आगामी विधान परिषद निवडणुकीत याचा परिणाम होणार नाही, असं अपक्ष आमदार देवेंद्र भुयार म्हणाले. तसेच आम्हाला मुख्यंमत्री भेटत नाही हे खरेच आहे. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, अपक्ष आमदारांची २० तारखेआधी भेट घ्या. त्यांची समजूत काढा. तसे मुख्यमंत्र्यांनी केले पाहिजे. आम्ही जनतेची कामे सांगतो, वैयक्तिक कामासाठी निधी मागत नाही, असेही भुयार यांनी म्हटले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाRajya Sabhaराज्यसभा