बोरखेडा हत्याकांडाच्या तपासाची केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:19 AM2021-03-09T04:19:27+5:302021-03-09T04:19:27+5:30

जळगाव : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे झालेल्या चौघं भावंडाच्या हत्येच्या तपासाची केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेतली असून सोमवारी पोलीस अधीक्षक ...

Union Home Ministry takes notice of Borkheda massacre | बोरखेडा हत्याकांडाच्या तपासाची केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल

बोरखेडा हत्याकांडाच्या तपासाची केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल

Next

जळगाव : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे झालेल्या चौघं भावंडाच्या हत्येच्या तपासाची केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेतली असून सोमवारी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी त्यांच्या दालनातून ऑनलाईन सादरीकरण केले. महाराष्ट्रभर गाजलेल्या बोरखेडा हत्याकांडाच्या तपासाची दखल म्हणजे पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

देशभरातील घटनांमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तपासाची दिशा मिळावी यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च ॲण्ड डेव्हलोपमेंट विभागातर्फे ही घटना अभ्यासाठी निवडण्यात आली आहे. ही घटना घडल्यानंतर तपास कशा रितीने केला. अतिशय गुंतागुंतीचा व क्लीष्ट तपास असल्याने दोषीला शिक्षा होत असताना निर्दोष व्यक्ती यात गोवला जावू नये याची विशेष खबरदारी या गुन्ह्यात घेण्यात आली. यात सुरुवातीला चार आरोपींचे नावे आली होती, शेवटी तपासात तांत्रिक, शास्त्रीय पुराव्यांची जोड मिळाल्यावर नेमका आरोपी निष्पन्न करुन त्याला पोलिसांनी अटक केली होती. सलग चार दिवस पोलीस अधीक्षक डॉ.मुंढे यांनी बोरखेडा व रावेरात ठाण मांडून तेथे नियंत्रण कक्ष तयार केला होता. मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक सतत संपर्कात राहून आढावा घेत होते. क्लीष्ट असलेला तपास चार दिवसात करुन आरोपी निष्पन्न करण्यात आला होता. महाराष्ट्रातून फक्त बोरखेड्याचीच घटना अभ्यासाठी घेण्यात आली होती. पोलीस अधीक्षकांच्या कामगिरीचे गृहमंत्रालयाने कौतूक केले.

Web Title: Union Home Ministry takes notice of Borkheda massacre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.