शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

युनियन बँकेच्या शिपायाच्या आत्महत्येप्रकरणी निम्न तापी प्रकल्पाच्या चालकासह दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 17:44 IST

मानसिक छळ केल्याचा आरोप, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा, दोन्ही आरोपी फरार

अमळनेर : युनियन बँकेतील शिपायाच्या आत्महत्येप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील रहिवासी व निम्न तापी प्रकल्पाचा चालक तसेच अमळनेर येथील तरुणासह दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सागर एकनाथ पाटील या युनियन बँकेतील शिपायाने ५ जून रोजी त्याच्या राहत्या घरी पंख्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी कडीस नायलॉन दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तत्पूर्वी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सागर याने त्याचे वडील एकनाथ पंढरीनाथ पाटील याना मी नायगाव येथे येत आहे असा फोन केला होता. मात्र सुमारे साडे बारा वाजेच्या सुमारास तो बँकेत आला नाही म्हणून मॅनेजर शुक्ला यांनी चौकशी केल्यावर सागरने आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली होती. घटनास्थळी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे यांनी भेट दिल्यावर त्यांना सागरने आत्महत्येपूर्वी चिट्ठी लिहिल्याचे आढळून आले. त्यात त्याने स्वप्नील विलास शिंदे उर्फ सैंदाने रा.अमळनेर व संतोष साहेबराव पोरजे रा. त्र्यंबकेश्वर नाशिक हल्ली मुक्काम निम्न तापी प्रकल्प हे दोघे मानसिक छळ करीत असून त्यांच्याजवळ एमएच ०८ अशी गाडी असल्याचे म्हटले होते. स्वप्नील पाटबंधारे खात्यात आहे तो गाडी चालवतो. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून मला न्याय द्यावा. माझ्या घरच्यांचा काही एक संबंध नाही. त्यांना सोडू नका, असेही चिठ्ठीत लिहिले होते. सागरच्या आत्महत्येनंतर त्याची मोटरसायकल स्वामी समर्थ मंदिराजवळ बेवारस स्थितीत आढळून आली होती. नागरिकांच्या तक्रारीवरून ती पोलिसांनी जप्त केली होती. व ती सागरची असल्याचे निदर्शनास आले होते. एकनाथ पाटील घरी गेल्यानन्तर त्यांनी पत्नी व इतर मुलांशी चर्चा केल्यानन्तर सागर नेहमी यांच्याबद्दल सांगायचा असे कळले. त्यावरून एकनाथ पाटील यांनी २२ रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून स्वप्नील शिंदे व संतोष पोरजे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहेत. दोन्ही आरोपी फरार झालेले आहेत.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmalnerअमळनेर