शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

‘रॉयल्टी’चा अस्त...वाळू स्वस्त...घर बांधा मस्त! ६०० रुपये प्रति ब्रास दराची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 17:22 IST

बुधवारी राज्य शासनाने वाळू विक्रीच्या नव्या धोरणाला मंजुरी दिली.

कुंदन पाटील

जळगाव : स्वस्त दरात वाळू उपलब्ध करून देण्याच्या महसूल विभागाने बुधवारी मंत्रीमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब केले. त्यानुसार आता ६०० रुपये प्रती ब्रास (१३३ रुपये प्रती मेट्रीक टन) दरात वाळू उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता घरबांधकामासह तयार घराच्या किंमतीही अवाक्यात येणार आहेत. 

बुधवारी राज्य शासनाने वाळू विक्रीच्या नव्या धोरणाला मंजुरी दिली. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षासाठी प्रति ब्रास ६०० रुपये (रुपये १३३ प्रति मेट्रिक टन) वाळू विक्रीचा दर निश्चित  केला आहे. यात स्वामित्व धनाची (रॉयल्टी) रक्कम माफ करण्यात येईल. खनिज प्रतिष्ठान निधी व वाहतूक परवाना सेवा शुल्क आदी खर्च आकारुन प्रति ब्रास ६०० रुपये दराने वाळूची तालुकानिहाय डेपोंवर विक्री होईल.

जिल्ह्यात १७ डेपो

प्राथमिक नियोजनानुसार जिल्ह्यात १७ वाळू आगारांसाठी जागा शोधण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक तालुक्यासाठी प्रत्येकी एक आगार असणार आहे. तर जळगाव आणि भुसावळ तालुक्यासाठी प्रत्येकी दोन वाळू आगार असतील. आगारांची संख्या मागणी व वाळूच्या स्त्रोतानुसार बदलली जाणार आहे, अशी माहिती महसुल प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

१८ वाळू गट पण ‘गिरणा’ भारी

पर्यावरण समितीने यापूर्वीच ८ वाळू गटांसाठी मंजुरी दिली आहे. तसेच १८ वाळू गटांसाठी सुधारित प्रस्ताव पर्यावरण समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. पर्यावरण समिती ३ वर्षांसाठी मंजुरी देणार आहे. त्यादृष्टीने सदरचे प्रस्ताव तयार केले जात आहेत. जिल्ह्यात ३६ हजार १३० ब्रास वाळूचा स्त्रोत आहे. त्यात घरबांधकामासाठी गिरणा नदीच्या वाळूची मोठ्या प्रमाणावर मागणी असते.शासनाच्या नव्या धोरणासंदर्भात अद्याप आदेश प्राप्त नाहीत. मात्र शासन सूचनेनुसार तालुकानिहाय आगारांसाठी जागांचा शोध याआधीच सुरु केला आहे. लवकरच नव्या धोरणानुसार अंमलबजावणी सुरु होईल.-प्रवीण महाजन, अपर जिल्हाधिकारी.

टॅग्स :Jalgaonजळगाव