शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

हृदयातून कुणी डावलू शकत नाही, अशी उद्धव ठाकरेंची प्रतिमा : गुलाबराव पाटील यांचा भाजपला चिमटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 13:07 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्य निवडीवर विरोधकांचा घेतला समाचार

जळगाव : 'कुणी राजकारण करावं की नाही करावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण माणसाला हृदयातून कुणी डावलू शकत नाही, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा आहे', अशा शब्दांत शिवसेनेचे उपनेते तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला टोला लगावला.महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय ध्वजारोहण समारंभाला हजेरी लावल्यानंतर ते अजिंठा विश्रामगृहात खरीप आढावा बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त सदस्यपदी नियुक्तीवरून सध्या राज्याच्या राजकारणात खल सुरू आहे. महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांच्या वाटेतील अडचण लक्षात घेऊन भाजप राजकारण करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याच पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे उपनेते तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी जळगावात या विषयावर बोलताना भाजपला चिमटा काढलाय.

*आमचा नेता एकच* गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, आमच्याकडे एकच नेता आहे. तो नेता जे बोलतो, तेच आम्ही पण बोलत असतो. म्हणूनच या विषयावर आतापर्यंत शिवसेनेकडून कोणत्याही नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. ही बाब माझ्या अखत्यारितील नाही. मी त्यावर जास्त भाष्य करणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राज्यपाल नियुक्त सदस्यपदी नियुक्ती करावी, अशी मागणी महाविकास आघाडीची आहे. त्यानंतर राज्यपालांनी निवडणूक जाहीर करण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे करणे, यात तांत्रिक मुद्दे आहेत की राजकारणाचे किंवा डावलण्याचे मुद्दे आहेत? हे मला माहिती नाही. या विषयाबाबत जे काही सुरू आहे, ते आपण पाहत आहातच, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव