शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिवस्मारकाच्या लोकार्पणासाठी उद्धव ठाकरे १० सप्टेंबरला जळगावात

By सुनील पाटील | Updated: August 22, 2023 15:39 IST

पिंप्राळ्यातील मुख्य चौकात शिवस्मारक उभारले जात आहे. त्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

जळगाव : पिंप्राळ्यात साकारण्यात येत असलेल्या शिवस्मारकाचे लोकार्पण १० सप्टेबर रोजी होत असून त्यासाठी शिवसेना प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जळगावात येणार आहे. त्यांचा दौरा निश्चित झालेला आहे. या दौऱ्याच्या नियोजनासाठी संपर्क प्रमुख संजय सावंत जळगावात दाखल झालेले आहेत. त्यांनी शिवस्मारकाला भेट देऊन कामाची पाहणी केली. दरम्यान, याच दौऱ्यात विधानसभेचीही चाचपणी होणार आहे.

पिंप्राळ्यातील मुख्य चौकात शिवस्मारक उभारले जात आहे. त्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. अश्वरुढ पुतळा धुळ्याहून तयार करुन आणण्यात आला आहे. पुतळ्याची परवानगी व प्रवेश नाट्य चांगलेच चर्चेत राहिले. दोन दिवसापूर्वीच मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनीही शिवस्मारकाला भेट दिली. सध्या कामाला गती देण्यात येत आहे. राजमुद्रा बसविण्यात आली असून पेव्हर ट्रॅक, विद्युत रोषणाई व सुशोभिकरण इतकेच काम बाकी आहे. आठ दिवसात हे काम पूर्ण होईल अशी माहिती उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिली.

पाच मतदार संघात विधानसभेची चाचपणीजळगाव शहर, जळगाव ग्रामीण, पाचोरा, पारोळा व चोपडा या पाच मतदार संघावर लक्ष केंद्रीत करुन तेथील संभाव्य उमेदवारांच्या सावंत यांच्याकडून भेटी घेतल्या जात आहेत. जळगाव शहरात महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील व जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे या तिघांनी निवडणूक लढण्याची तयारी दर्शविली आहे.  

मानराज पार्कवर होणार सभाशिवस्मारकाचे लोकार्पण झाल्यानंतर मानराज पार्कच्या मैदानावर जाहिर सभा होणार आहे. जिल्हाभरातून एक लाख शिवसैनिक सभेला येतील असे नियोजन करण्यात येत आहे. या सभेतूनच आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. ४ सप्टेबर रोजी शरद पवारांचीही सागर पार्कवर सभा होणार आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेJalgaonजळगाव