इंद्रसिंग दगडू पाटील (२७) व भूषण कौतिक पाटील (२२ रा. जळू, ता. एरंडोल) अशी या ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.
इंद्रसिंग व भूषण पाटील हे दोघे युवक एरंडोलहून मोटारसायकलने (क्र. एम एच २० एफ क्यू ७५०५) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून घरी जळूकडे जात होते. त्याच वेळी शहा पेट्रोल पंपानजीक पारोळ्याहून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (क्र. एम एच १९ झेड ४५२७) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात इंद्रसिंग व भूषण हे दोघे युवक जागीच ठार झाले.
घटना घडताच ट्रकचालक वाहन सोडून फरार झाला. याबाबत नरेंद्रसिंग पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरून एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विलास पाटील, जुबेर खाटीक, विकास खैरनार हे करीत आहेत.