शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार प्रकरणाचे निवेदन देणाऱ्यासाठी जाणारे पाळधीचे दोन तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 19:29 IST

जळगाव- औरंगाबाद रस्त्यावरील अपघातात एक जण जखमी

ठळक मुद्देऔरंगाबाद- जळगाव रस्त्यावरील पाळधी गावाजवळील घटनाअपघातानंतर ट्रकचालकाला पहूरजवळ पकडले.दोघांचा उपचारादरम्यान जळगावातील जिल्हा रुग्णालयात मृत्यू

आॅनलाईन लोकमतपाळधी, ता.जामनेर,दि.१८ - कठुआ येथील बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी निवेदन देण्यासाठी जात असलेल्या तरुणांच्या दुचाकीला बुधवारी सकाळी ११.३० वाजता अपघात झाला. त्यात दोन तरुण जागीच ठार झाले तर अन्य एक जण जखमी झाला आहे.पाळधी येथील शाहरूख इब्राहिम तडवी (वय २१), सादिक हकीम तडवी (वय २० ) व सिकंदर बाबू तडवी हे कठुआ येथील बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी निवेदन देण्यासाठी पहूर येथे आले होते. तिघे तरुण मोटारसायकलने पहुर येथून परत येत असताना पाळधी गावाजवळच ४०७ ट्रक चालक (क्र.एमएच १९/३३९५) ओव्हरटेक करण्याच्या नांदात जोरदार धडक दिली. त्यामुळे मोटारसायकल वरील तिघे जण गंभीर जखमी झाले. प्रथम त्यांना गावातीलच एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांना जबर मार लागलेला असल्याने डॉक्टरांनी जळगाव येथे हलविण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना जळगाव येथे जिल्हा सरकारी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता शाहरूख इब्राहिम तडवी (वय २१) याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर काही वेळेत सादिक हकीम तडवी (वय 20 ) याचाही मृत्यू झाला. अपघातात तिसरा तरुण सिकंदर बाबू तडवी हा गंबीर जखमी आहे. धडक देणारा ट्रक हा पहुर पासून पुढे एक किमी अंतरावर पकडण्यात आला. ट्रक चालक हा पहुर पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघात