शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

दोन तरुणांनी दगडांचा मारा केल्याने बिबट्याची धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 12:29 IST

वरसाडे तांडा गावातील थरार : बिबट्याच्या रुपाने साक्षात पाहिला मृत्यू

जळगाव : शेतात निंदणी सुरु असताना एका महिलेवर अचानक बिबट्याने झडप घातली़ ते पाहून समोरच असलेल्या तिच्या पतीने अंगातील सारे बळ एकवटून तब्बल १० ते १५ मिनिटे बिबट्याशी झुंज दिली़ त्याचवेळी मदतीला आलेल्या दोन तरुणांनी जीवाची पर्वा न करता बिबट्यावर दगडांचा मारा केला. या आक्रमणाने बिबट्याने दोन पावले मागे हटत तिथून पळ काढला़ जीवाचा थरकाप उडविणारी ही घटना वरसाडे तांडा (ता. पाचोरा) येथे रविवारी दुपारी १२ वाजता घडली़या घटनेत भारत सरिचंद चव्हाण (३०) व त्यांची पत्नी मनिषा भारत चव्हाण (२३, रा़ वरसाडे तांडा़ ता़ पाचोरा) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जळगावच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे़त.भारत आणि बिबट्या यांच्यात सुरू असलेल्या झटापटीत आजूबाजूचे लोकही तिथे आले पण समोर प्रत्यक्ष बिबट्या असल्याचे पाहून तेही मागे सरकले. भितीपोटी कुणीही मदतीला सरसावले नाही़ काही वेळाने तिथे असलेल्या नंतर दोन तरूणांनी बिबट्यावर दगडांचा मारा सुरु केला. यामुळे बिबट्याने शेतातून पळ काढला.दरम्यान, या घटनेत भारत व त्याची पत्नी मनिषा हे गंभीर जखमी झाले़ त्यांना त्वरित पिंपळगाव हरेश्वर येथे रूग्णालयात नेण्यात आले़ त्यानंतर त्वरित जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.भारत यांच्या डोळे, छाती आणि हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत. डोळ्याजवळून रक्तस्त्रात सुरू होत होता. दोन्ही जखमींना जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांची एकच गर्दी झाली होती.बिबटयाशी झटापट सुरु असताना त्याच्या रुपाने आपण साक्षात मृत्यू पाहिल्याचा अनुभव त्यांनी सांगितला.चव्हाण यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण दाम्पत्य हे शेतात मजुरी करून घराचा उदरनिर्वाह करतात़ रविवारी गावातील शेतात त्यांना निंदणीची कामे मिळाली़ त्यामुळे दोघेही सकाळीच शेतात पोहचले. मनिषा या बाजरीच्या शेतात काम करित असताना दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक बिबट्याने त्यांच्या झडप घालत त्यांच्या कमरेला चावा घेतला़ त्याचवेळी भारत हे काही फूटावर काम करीत होते. बिबट्याने पत्नीवर हल्ला केल्याचे लक्षात येताच त्यांनी बिबट्यापासून पत्नीची कशी- बशी सुटका केली़ तोच बिबट्याने भारत यांच्यावर हल्ला चढविला़ यात दोघांमध्ये तब्बल १० ते १५ मिनिटे झुंज सुरू होती. बिबट्याने भारत याच्या हाताला पकडून ठेवले होते़ त्यामुळे भारत हे दुसऱ्या हाताने त्याच्यावर दगडाने मारा करीत होते़ बिबट्याला त्यांनी पाया खाली दाबले़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव