शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

चाकू हल्ला प्रकरणात दोघा भावांना २ वर्षाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 22:11 IST

निकाल : २५ हजार रूपयांचा ठोठावला दंड

जळगाव- दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारल्याचा राग येऊन संतोष भगवान पाटील (रा़ बालाजी पेठ) यांच्यावर चाकू हल्ला झाला होता. याप्रकरणात आरोपी मनोज उर्फ मन्या रामचंद्र सपकाळे व राहुल उर्फ बबलू रामचंद्र सपकाळे (रा.शनिपेठ) या सख्या भावांना शुक्रवारी न्यायालयाने दोषी धरून २ वर्ष सश्रम कारावासाच्या शिक्षेसह २५ हजार रूपयांचा दंड प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी़ए़सानप यांनी ठोठावला.बालाजी पेठेतील संतोष पाटीले हे २ जानेवारी २०१४ रोजी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास दुध फेडरेशनमार्गे पाळधी येथील मंदिरात दर्शनासाठी जात होते. त्यावेळी मनोज सपकाळे व राहुल सपकाळे दोघे भाऊ दुचाकीवरून जात असताना त्यांनी संतोष पाटील यांना कट मारला. पाटील यांनी लागलीच दोघांना दुचाकी सावकाश चालवा असे सांगितले़ याचा राग येऊन दोघांनी त्यांना मारहाण छातीवर आणि पोटावर चाकूने वार केले. हा प्रकार रस्त्यातील ये-जा करणाऱ्यांनी पाहताच त्यांनी दोघांच्या हातातून पाटील यांची सुटका केली होती़. नंतर त्यांच्या फिर्यादीवरून दोन्ही भावांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सात साक्षीदार तपासलेदोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर खटला हा न्यायालयात सुरू झाला. यात सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. नीलेश चौधरी यांनी ७ साक्षीदार तपासले़ त्यामध्ये वैद्यकी अधिकारी डॉ़ राहुल निकम, फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी व तपासी अधिकारी सार्थक नेहते यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या़ विशेष बाब म्हणजे गुन्ह्यातील हत्यार हे जप्त करण्यात आलेले नव्हते़ मात्र, अ‍ॅड. नीलेश चौधरी यांनी गुन्हा सिद्धीसाठी हत्याराची आवश्यकता नसल्याबाबतचा जोरदार युक्तीवाद केला. हा युक्तीवाद न्यायाधीश जी.ए.सानप यांनी ग्राह्य धरून मनोज आणि राहूल या दोघांना दोषी ठरविले. नंतर शुक्रवारी न्या़ सानप यांनी मनोज सपकाळे आणि राहुल सपकाळे या भावांना २ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा व २५ हजार रूपयांची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड.नीलेश चौधरी यांनी तर बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. डी़.जे़.पाटील यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव