जळगाव : जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील एमआयडीसी पोलीस स्टेशन समोर अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने गोपाल देविदास राठोड (३२, रा. लिहे तांडा, ता. जामनेर) हा दुचाकीचालक जागीच ठार झाला तर मागे बसलेले उत्तम तोतीलाल राठोड (वय-५४ रा़ लिहे तांडा) हे गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री १२़.१० वाजता झाला. जखमीवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहे़ दरम्यान, अपघातातील मयताची शनिवारी सकाळी ओळख पटली. महामार्गावर सलग तिसऱ्या दिवशी हा अपघात झाल्याने सततच्या अपघातामुळे शहरवासीय भयभीत झाले आहेत.गोपाल राठोड व उत्तम राठोड हे दुचाकीने (क्ऱ एमएच़ १९़ बीएच़४९९६) ने शहराकडून एमआयडीसीच्या दिशेने जात होते़ याचवेळी मागून येणाºया अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली़वाहनाच्या चाकाखाली येऊन दुचाकी चालक जागेवरच ठार झाला़ तर दुचाकीवर मागे बसलेले उत्तम राठोड हे गंभीर जखमी झाले़ दुचाकीचा पुढील भाग चक्काचूर झाला होता़ घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़ तर घटनास्थळावर नागरिकांची तसेच वाहनांची प्रचंड गर्दी झालेली होती़ पोलिसांनी रूग्णवाहिका बोलवून जखमी उत्तम राठोड यांना जिल्हा रूग्णालयात हलविले़पोलिसांनी घटनास्थळी मयत झालेल्याची अंगझडती घेतली़ त्यात काही कागदपत्रे आढळून आले मात्र तरीही ओळख पटली नव्हती. त्यात श्रीरामपूर ग्रामपंचायतीचा दाखला होता़ त्यात साजन चव्हाण असे नाव लिहिलेले होते़ मात्र तरीदेखील पोलिसांना रात्री ओळख पटेल असे काही मिळाले नाही़ अखेर शनिवारी सकाळी मयताची ओळख पटली.
जळगावात अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक, दुचाकीचालक ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 13:20 IST
एमआयडीसी पोलीस स्टेशनसमोरील घटना
जळगावात अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक, दुचाकीचालक ठार, एक जखमी
ठळक मुद्देरात्री १२ वाजेची घटना जखमीवर जिल्हा रूग्णालयात उपचार