शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 11:11 IST

जळगाव : भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दौलत उत्तम शेरे (४०, सुप्रीम कॉलनी) हा दुचाकीस्वार तरुण जागीच ठार ...

जळगाव : भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दौलत उत्तम शेरे (४०, सुप्रीम कॉलनी) हा दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी औरंगाबाद रस्त्यावर सुप्रिम कॉलनीत घडली. दरम्यान, अपघातानंतर तणाव निर्माण झाल्याने चालकाने ट्रक सोडून पलायन केले. पोलिसांनी लागलीच धाव घेतल्याने मोठी घटना टळली. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौलत शेरे हा तरुण एमआयडीसीत मिळेल तेथे हमाली काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होता. मंगळवारी सायंकाळी कामावरुन दुचाकीने (एम.एच.२१ एफ.१६७६) घरी येत असताना सुप्रीम कॉलनीकडून भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने (एम.एच.०४ एफ.डी.२०१३) टिपू सुलतान चौकाजवळ दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. त्यात दौलत याच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच गतप्राण झाला.या अपघाताची माहिती मिळताच उपनिरीक्षक विशाल वाठोरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, महेंद्रसिंग पाटील, जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, स्वप्नील पाटील, भूषण सोनार व माजी सैनिक रवींद्र बाविस्कर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृताला तातडीने जिल्हा रुग्णालयात रवाना केले. तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले.गर्दीवर मिळविले नियंत्रणया अपघातामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवून नागरिकांची समजूत घातली. पलायन केलेल्या ट्रक चालकाचे नाव मुस्ताक अहमद अब्दुल नबी (रा.चोपडा, ह.मु.सुप्रीम कॉलनी) असे असल्याचे समजले. पोलिसांनी त्यास ट्रान्सपोर्ट नगरातून ताब्यात घेतले. हवालदार शिवदास चौधरी यांनी पंचनामा केला. तपास उपनिरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव