शहरं
Join us  
Trending Stories
1
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
2
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
3
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
4
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
5
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
6
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
7
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
8
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
9
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
10
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
11
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
12
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
13
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
14
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
15
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
16
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
17
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
18
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
19
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
20
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, दाम्पत्य ठार, चिमुरडा बचावला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 14:22 IST

मयत सामरोदचे : नशिराबादनजीकच्या घटनेतील चालकासह वाहन पसार

जळगाव : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सामरोद (जामनेर) येथील दाम्पत्य ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नशिराबादनजीक घडली. या घटनेत दाम्पत्याचा ३ वर्षीय चिमुरडा सुदैवाने बचावला आहे. 

शेनफडू बाबुराव कोळी (वय ३५, रा. सामरोद ता. जामनेर) हे त्यांची पत्नी भारती कोळी (वय ३२) अशी मयतांची नावे आहेत. तर या दाम्पत्याचा ३ वर्षीय मुलगा रुद्र हा या अपघातात बचावला आहे. कोळी दाम्पत्य जळगाव तालुक्यातील आसोदा येथील नातेवाईकांना भेटून सामरोदकडे जात होते.नशिराबाद, कुऱ्हामार्गे सामरोद जाण्यासाठी  तिघे जण दुचाकीने (क्र. एमएच १९ ए ए २०९५) निघाले. सकाळी ९ वाजेच्या सुमारास नशिराबादनजीक दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तिघे जण रस्त्यावर फेकले गेले. त्यात भारतीचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी शेनफडूसह रुद्रला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शेनफडूचाही मृत्यू झाला. तर रुद्र हा सुखरुप असून जिल्हा रुग्णालयात कोळी यांच्या नातेवाईकांनी धाव घेत प्रचंड आक्रोश केला.

चिमुरड्याचा आक्रोशअपघात झाल्यानंतर रस्त्यावर पडलेला रुद्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आई भारतीला बघून प्रचंड भेदरला. तर वडील शेनफडू यांच्याही डोक्यातून रक्तस्त्राव सुरु असल्याने रुद्र रस्त्याच्याकडेल आक्रोश करीत होता. तेव्हा मदतकार्य करणाऱ्यांनी रुद्रला पाणी पाजले आणि कुशीत घेतले. त्याला धीर देत जिल्हा रुग्णालयात आणले. नातेवाईक आल्यावर रुद्रला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

सामरोदला अंत्यसंस्कारकोळी दाम्पत्य शेती कसत असल्याचे सांगण्यात आले. आर्थिक परिस्थिती नाजूक असताना या घटनेने त्यांच्या आयुष्यावर झडप घातल्याने त्यांच्या नातेवाईकांना जिल्हा रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. शवविच्छेदनानंतर शेनफडू आणि भारतीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शनिवारी सायंकाळी सामरोद येथे दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, नशिराबाद पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा चालकाचा शोध घेतला जात असल्याचे नशिराबाद पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघात