शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार, दोन गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 20:15 IST

वरणगाव-बोदवड मार्गावरील अपघात

Bike Accident: वरणगावहून आचेगावकडे जाणाऱ्या व्यक्तीच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराने धडक दिल्याने आचेगाव येथील शरद भास्कर पाटील (७०) यांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले.

ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास वरणगाव ते बोदवड मार्गावरील नागेश्वर मंदिराचे पुढे काही अंतरावर घडली. शरद पाटील (वय ७०, रा. आंचेगाव) हे दुचाकीने (एमएच १९/ एएस ६९९१) आचेगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकलशी (एमएच २८/बीएस ९१४१) धडक झाली. या अपघातात चालक शेख गनी शेख मौलाना (वय ६६) व अशोक रामदास खराटे (वय ५५) दोघे रा. बोदवड यांचे सह शरद पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता शरद पाटील यांना मयत घोषित केले. इतर दोघांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामधे पाठविण्यात आले. दरम्यान, येथे दुपारी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी रुग्णालयामधे भेट देऊन माहिती घेतली. या बाबत वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार श्रावण जवरे पुढील तपास करीत आहे. डॉक्टर वेळेत उपलब्ध न झाल्याचा आरोपवरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर उशिरा आल्याचा आरोप शरद पाटील यांच्या नातेवाईकांनी केला आहे. वेळेवर उपचार मिळाले असते, तर शरद पाटील यांचा मृत्यू टळू शकला असता, असे मयताचा पुतण्या नरेंद्र चंद्रकांत पाटील व इतरांनी सांगितले.

मी कामानिमित्त बाहेर गेलो होतो. फोन आल्यानंतर रुग्णालयात पोहोचलो असता जखमीची परिस्थिती गंभीर होती. त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याने ऑक्सिजनसुद्धा लावू शकत नव्हतो. त्यामुळे नातलगांनी केलेला आरोप चुकीचा आहे.डॉ. सचिन अहिरे, वैद्यकीय अधिकारी, वरणगाव

टॅग्स :Accidentअपघात