शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत रोहीत्राची केबल चोरताना दोघांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 21:18 IST

एमआयडीतील प्रकार : गुन्हा दाखल

जळगाव : एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये महावितरणच्या स्टोअर रुमच्या आवारातून विद्युत रोहित्राची केबल चोरणाऱ्या चेतन केशव साळुंखे (३२) व बाळू सैंदाणे (रा.सदगुरु नगर, आयोध्या नगर) या दोघांना सोमवारी सायंकाळी महावितरणच्याच कर्मचाऱ्यांनी पकडले. त्यांना अटक करण्यात आली असून दोघांकडून दीड हजार रुपये किमतीची केबल हस्तगत करण्यात आली आहे.एमआयडीसी जी सेक्टर परिसरात महावितरण कंपनीचे गाळी कक्ष स्टोअरचे कार्यालय आहे. संदीप गजेंद्रसिंग निरंजन हे याठिकाणी सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहे. २७ रोजी कर्मचारी निलेश पर्वतकर व पंकज सपकाळे या कर्मचा‍ºयांना कार्यालय परिसरात दोन जण विद्युत रोहित्रास लागणारी केबल चोरून घेवून जात असल्याचे कर्मचाºयांना दिसले. या दोघा कर्मचा‍ºयांनी केबल चोरणा‍ºया दोघांचा पाठलाग केला. या एक जण त्याच्या हातातील केबल सोडून पसार झाला तर चेतन केशव साळुंखे यास पकडण्यात आले. साळुंखे यास सोबत असलेल्याचे नाव विचारले असता बाळू सैंदाणे असे त्याने सांगितले.फरार संशयितासह पोलिसांनी पकडलेयाबाबत महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता संदीप निरंजन यांनी हा प्रकार एमआयडीसी पोलिसांना कळविला. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठून चेतन साळुंखे यास ताब्यात घेतले. याप्रकरणी संदीप निरंजन यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार बाळू सैंदाणे यास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी,आनंदसिंग पाटील, हेमंत कळसकर, अतुल पाटील, चंद्रकांत पाटील, विजय बावस्कर, सचिन पाटील व मुकेश पाटील यांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव