शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दोन आठवड्यात सोने ५०० रुपयांनी घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 12:03 IST

पाच दिवसांपूर्वी गेले होते ३१ हजाराच्या खाली

जळगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव घसरल्याने तसेच डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयामध्ये सुधारणा होत असल्याने दोन आठवड्यात सोन्याचे भाव ५०० रुपये प्रती तोळ््याने घसरले आहेत. सुवर्णनगरी जळगावात ५ डिसेंबर रोजी सोन्याचे भाव ३१ हजार ३०० रुपये होते. ऐन खरेदीच्या हंगामात भाव कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य या घटकांसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील विशेषत: अमेरिकेतील सोने- चांदीच्या भावातील चढ-उताराचा परिणाम भारतीय सुवर्ण बाजारावर होत असतो. त्यानुसार आताही आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव घसरल्याने सोन्याचे भाव गडगडले आहे. या सोबतच ७३ रुपयांवर गेलेले अमेरिकन डॉलरचे दर ७०.७२ रुपयांवर आल्याने सोन्यात घसरण होण्यास मदत होत आहे.गेल्या महिन्यापासून घसरण सुरूचगेल्या महिन्यात सोने ३२ हजारावर पोहचले होते. दिवाळीच्या काळात धनत्रयोदशीच्या मुहूर्तापासून सोने ३२ हजार ४०० रुपयांवर होते. मात्र अमेरिकेत सोन्याचे भाव कमी होताच ९ नोव्हेंबर, भाऊबीजेपासून कमी होत गेले. १० नोव्हेंबर रोजी सोने ३१ हजार ९०० रुपये प्रती तोळ््यावर येऊन सोने पुन्हा ३२ हजाराच्या खाली आले. तेव्हापासून घसरण सुरूच असून १२ नोव्हेंबरनंतर २०० रुपयांनी पुन्हा सोन्याचे भाव कमी होऊन ते १३ रोजी ३१ हजार ७०० रुपये प्रती तोळा झाले. त्यानंतर त्यात थोडी सुधारणा होऊन २१ नोव्हेंबर रोजी सोने ३१ हजार ८०० रुपयांवर पोहचले. त्यानंतर पुन्हा घसरण होऊन सोने २३ रोजी ३१ हजार ६००, २४ रोजी ३१ हजार ४०० रुपयांवर आले. २९ नोव्हेंबर रोजी तर ते ३१ हजार २०० रुपयांवर आले होेते.३१ हजाराच्या खालीमध्यंतरी तर एक दिवस म्हणजेच ३० नोव्हेंबर रोजी सोने ३० हजार ९०० रुपयांवर आले. मात्र त्यानंतर त्यात सुधारणा झाली व ते ५ नोव्हेंबर रोजी ३१ हजार ३०० रुपयांवर पोहचले. मात्र गेल्या दोन आठवड्याचा विचार केला तर २१ नोव्हेंबर नंतर घसरण होऊन ५ डिसेंबरपर्यंत सोने ५०० रुपये प्रती तोळ््याने कमी झाले व ते ३१ हजार ३०० रुपयांवर आले.आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव कमी झाल्याने व रुपयात सुधारणा झाल्याने सोन्याचे दर कमी झाले आहे.- स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन.

टॅग्स :GoldसोनंJalgaonजळगाव