शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरातील महामार्गावर अंगावरुन ट्रक गेल्याने दुचाकीस्वार तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 21:01 IST

रिक्षाने कट मारल्यामुळे रस्त्यावर दुचाकीसह कोसळल्याने मागून भरधाव वेगाने आलेला ट्रक अंगावरुन गेल्याने मयुर सुनील दिवेकर (वय २८ रा. शनी पेठ, जळगाव) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सात वाजता राष्टÑीय महामार्गावर शिव कॉलनी पुलाजवळ घडली. दरम्यान, ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्दे शिवकॉलनी पुलावर अपघात  रिक्षाने कट मारल्यामुळे दुचाकीस्वार कोसळला रस्त्यावर ट्रक चालकाला घेतले ताब्यात

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१५ : रिक्षाने कट मारल्यामुळे रस्त्यावर दुचाकीसह कोसळल्याने मागून भरधाव वेगाने आलेला ट्रक अंगावरुन गेल्याने मयुर सुनील दिवेकर (वय २८ रा. शनी पेठ, जळगाव) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सात वाजता राष्टÑीय महामार्गावर शिव कॉलनी पुलाजवळ घडली. दरम्यान, ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मयुर हा रविवारी सायंकाळी गुजराल पेट्रोल पंपाकडून दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.एल.८८८४) शहराकडे येत असताना महामार्गावर शिव कॉलनी पुलाजवळ रिक्षाचा त्याच्या दुचाकीला कट लागला. त्यामुळे तो रस्त्यावर कोसळला. त्याच वेळी धुळ्याकडून भरधाव वेगाने येणारा ट्रक (क्र.आर.जे.११ जी.ए.५८४०) त्याच्या अंगावरुन गेल्याने तो जागीच गतप्राण झाला.तरुण धावले मदतीलाअपघात झाल्यामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. मयुर हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, त्यामुळे अनेक जण फक्त घटना बघत होते, परंतु मदतीसाठी कोणीही पुढे येत नव्हते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर विवेक ठाकरे, प्रशांत सुर्वे, धीरज सूर्यवंशी, पौरस चौधरी व गौरव पाटील आदी तरुणांचा गट तातडीने घटनास्थळी धावला. या तरुणांनी मयुर याला उचलून रिक्षातून जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याला मृत घोषीत केले.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा