शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:26 IST

सलग दुसऱ्या दिवशी कारवाई, एकूण तीन ट्रॅक्टर जप्त

जळगाव : जिल्ह्यात वाळू उपशास बंदी असली तरीही वाळू वाहतूक सुरूच असून शुक्रवारी पुन्हा दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. सलग दुसºया दिवशी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे दोन दिवसात एकूण तीन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत.जिल्ह्यात वाळू उपशास बंदी असून तीन दिवसांपूर्वी बांभोरी येथील वाळू गटही रद्द करण्यात आल्याने वाळू उपशास आळा बसणे अपेक्षित आहे. असे असले तरी राजरोसपणे वाळू वाहतूक सुरुच असल्याचे समोर येत आहे.शुक्रवारी निमेखडी शिवारातील नदीपात्रातून वाळूची चोरी करताना दोन ट्रॅक्टर प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालयाच्या पथकाने पकडले.सकाळी सव्वा आठ वाजता मंडळाधिकारी योगेश नन्नवरे, प्रांताधिकारी कार्यालयाचे अतुल सानप हे निमखेडी शिवारात गस्त घालत असताना त्यांना दोन ट्रॅक्टर वाळूचा उपसा करून नेताना आढळून आहे. त्यात एमएच १९, पी.६७२१ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरसह एका विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरचा समावेश आहे. दोन्ही ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले आहेत.गुरुवारीदेखील तहसील कार्यालय व प्रांत कार्यालयाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर सावखेडा शिवारात नदी पात्रामध्ये पकडले होते. ते ट्रॅक्टरदेखील जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव