लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ५ वी ते ८ वी पर्यंतच्या जिल्ह्यातील १९२६ शाळा सुरू करण्याचे नियोजन बुधवार २७ जानेवारीपासून शिक्षण विभागाकडून सुरू असून यात १३ हजार शिक्षकांच्या कोरोना चाचण्या होणार आहे. ७० टक्के शिक्षकांच्या चाचण्या झाल्या असून नव्याने दोन शिक्षक बाधित आढळल्याची माहिती शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी दिली.
२१ जानेवारीपासून शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. त्यात या चाचण्या पूर्ण करण्याचेही एक आव्हान शिक्षण विभागापुढे आहेत. मात्र, आधीच काही शिक्षकांच्या चाचण्या झाल्या असून येत्या दोन दिवसांत सर्व शिक्षकांच्या चाचण्या पूर्ण होतील, अशी माहिती अधिकारी अकलाडे यांनी दिली. एरंडोल आणि चोपडा तालुक्यात प्रत्येकी एक शिक्षक बाधित आढळून आला आहे. त्यांना होम क्वाॅरंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करताना जे नियम लागू करण्यात आले होते. तेच नियम या शाळांसाठीही कायम राहतील, अशी माहिती अकलाडे यांनी दिली.
जिल्ह्यातील शाळा : १९२६
विद्यार्थी : ३ लाख १० हजार २०१
शिक्षक २० हजार ५५४
चाचणी होणारे शिक्षक १३ हजार