शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा जळगाव शहरातील मेहरुण तलावात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 21:47 IST

मेहरुण तलावात पोहायला गेलेल्या मोहम्मद दानिश मो.युसुफोद्दीन (वय १३) व मोहम्मद खलिक अनिसोद्दीन पिरजादे (वय १४) दोन्ही रा. पिरजादे वाडा, मेहरुण, जळगाव या मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी चार वाजता घडली. दोन्हीही मुले मेहरुणमधील मनपा शाळेचे विद्यार्थी आहेत.

ठळक मुद्देदोन्ही मुले पिरजादे वाड्यातील रहिवाशी   खोल खड्डयात बुडाल्याने झाला मृत्यू पोहता येत नसल्याने बेतले जीवावर

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,३०  : मेहरुण तलावात पोहायला गेलेल्या मोहम्मद दानिश मो.युसुफोद्दीन (वय १३) व मोहम्मद खलिक अनिसोद्दीन पिरजादे (वय १४) दोन्ही रा. पिरजादे वाडा, मेहरुण, जळगाव या मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी चार वाजता घडली. दोन्हीही मुले मेहरुणमधील मनपा शाळेचे विद्यार्थी आहेत.

पोहता येत नसल्याने बेतले जीवावरयाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मोहम्मद दानिश व मोहम्मद खलिक हे दोन्ही दुपारी तीन वाजता मेहरुण तलावात पोहण्यासाठी गेले होते. शेती शिवार असलेल्या परिसरात ते गुडघ्याबरोबर असलेल्या पाण्यात पोहत असताना अचानक पुढे गेले व तेथे असलेल्या खोल खड्डयात बुडाले. दोघांनाही पोहता येत नसल्याने त्यांनी पाण्याच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना अपयश आले.दोन तरुण धावले मदतीला..पाण्याच्या डोहात दोन मुले बुडाल्याचे लक्षात येताच तलावाच्या काठी म्हशी चारणाºया गुराख्याने धाव घेतली. त्याचवेळी मेहरुण, पिरजादे वाड्यातील कफील अहमद पिरजादे व जमील नवास अकीलोद्दीन पिरजादे हे शेतातून घराकडे येत असल्याने गुराख्याने त्यांना ही घटना सांगितली. या दोन्ही तरुणांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेतली. दोघांना बाहेर काढले. तत्पूर्वी समाजवादी पक्षाची रुग्णवाहिका घटनास्थळी पाठविण्याचा निरोप सहकाºयांना देण्यात आला होता. ही रुग्णवाहिका दाखल होताच त्यातून दोघांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा वाटेतच मृत्यू झालेला होता.

दोन्ही एकाच शाळेचे विद्यार्थीदानिश व खलिल हे दोन्ही मेहरुणमधील मनपाच्या  शाळेचे विद्यार्थी आहेत. दानिश सहावी तर खलिल सातवीचा विद्यार्थी आहे. दोघांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीचीच आहे. आई, वडील शेती व मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात. खलील याच्या पश्चात दोन भाऊ तर दानिश याच्या पश्चात चार भाऊ आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा