शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
5
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
6
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
7
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
8
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
9
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
10
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
11
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
12
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
13
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
14
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
15
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
16
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
17
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
18
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
19
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
20
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी

रिव्हॉल्वर चोरी प्रकरणात दोन पोलीस निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 11:27 IST

 कर्तव्यात कसूर केल्याचा राखीव निरीक्षकांवर ठपका

ठळक मुद्देचौकशी अहवालात ठेवला ठपका

जळगाव : पोलीस वर्धापन दिनानिमित्त काव्यरत्नावली चौकात आयोजित शस्त्र प्रदर्शनातून रिव्हॉल्वर चोरी झाल्याच्या प्रकरणात पोलीस नाईक विजय अभिमन शिंदे व कॉ. योगेश श्रीराम मासरे या दोन जणांना गुरुवारी निलंबित करण्यात आले. तसेच राखीव पोलीस निरीक्षक सुभाष कावरे यांचा कसुरी अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी ‘लोकमत’ ला दिली.पोलीस वर्धापनदिनानिमित्त जिल्हा पोलीस दलाच्यावतीने ४ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत काव्यरत्नावली चौकात शस्त्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात टेबल क्रमांक ४ वर विजय शिंदे यांची तर टेबल क्रमांक १ वर योगेश मासरे यांना नेमण्यात आले होते. दोन्ही टेबलवर प्रत्येकी तीन शस्त्र होते.दोन्ही कर्मचाऱ्यांनी दुपारी जेवणाला जाताना तेथे दुसºया कर्मचाºयाची नियुक्ती केली नाही तसेच पूर्वपरवानगीने टेबल सोडला होता व त्याच वेळी ३८ स्ट्रम रुगल हे रिव्हॉल्वर चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता.सहायक पोलीस अधीक्षकांकडे चौकशीशिंदे व मासरे या दोघांवर कारवाई झाल्यानंतर या प्रकरणात राखीव पोलीस निरीक्षक सुभाष कावरे यांचाही हलगर्जीपणा निष्पन्न झाला आहे. त्यामुळे त्यांचाही कसुरी अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी आता सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती अधीक्षक शिंदे यांनी दिली. दरम्यान, या घटनेला आठवडा झाला तरी अद्यापही रिव्हॉल्वर सापडलेले नाही.चौकशी अहवालात ठेवला ठपकारिव्हॉल्वर चोरी झाल्यानंतर रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामानंद नगर पोलीस व उपअधीक्षक (गृह) यांच्यामार्फत या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरु होती. त्यात शिंदे व मासरे यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा चौकशी अहवाल उपअधीक्षकांनी पाठविला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी दोघांना निलंबित केले.पाचोºयाचे डी.एम.पाटील यांच्याजवळ पुणे विमानतळावर आढळली २२ काडतुसेजिल्हा परिषदेचे माजी सदस्य व भाजप कार्यकर्ते दिलीप मुकुंदराव पाटील उर्फ डी.एम.पाटील (रा.पाचोरा) यांच्या बॅगेत गुरुवारी पहाटे पावणे पाच वाजता पुणे विमानतळावर तब्बल २२ काडतुसे आढळून आली. याच वेळी आणखी एका प्रवाशाजवळही दोन काडतुसे आढळून आली. विमान प्रवासात रिव्हॉल्व्हर अथवा काडतुसे घेऊन जाण्यास मनाई आहे, असे असताना प्रवाशांच्या साहित्यात काडतुसे आढळल्याने या प्रवाशांना विमानतळ पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.डि.एम. पाटील हे पुण्याहून स्पाईस जेट एअरवेजने बंगळुरुला गुरुवारी जाणार होते़ त्यांच्याकडील साहित्याची तपासणी करीत असताना त्यांच्या बॅगेत २२ काडतुसे आढळून आली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पाटील यांच्याकडे रिव्हॉल्व्हरचा परवाना आढळून आला.४नजर चुकीने हे २२ काडतुसे आल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले. त्यांच्याकडे केवळ काडतुसे होती,रिव्हॉल्व्हर नव्हते. दुसरे प्रवासी भगवान चरणसिंह (वय ६०) हे पुण्याहून दिल्लीला जाणार होते. त्यांच्याही सामानात त्याच दरम्यान २ काडतुसे आढळून आली. त्यांनाही विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.जळगाव पोलिसांशी संपर्क४ पुणे विमानतळ पोलिसांनी जळगाव पोलिसांशी संपर्क साधून पाटील यांच्याबाबत माहिती घेतली. राजकीय व शिक्षण क्षेत्रात ते कार्यरत असून गुन्हेगारीशी त्यांचा संबंध नसल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिले. याबाबत पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना विचारले असता पुणे पोलिसांकडून काहीच विचारणा झाली नसल्याचे सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी