अमळनेरात दोन खुनांमुळे लॉकडाऊनच्या शांततेचा भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 04:02 PM2020-04-24T16:02:54+5:302020-04-24T16:04:35+5:30

सर्वत्र आनंद शांतता असताना मात्र अमळनेरात १५ दिवसांनंतर दोन सराईत गुन्हेगारांच्या खुनामुळे शांततेला सुरुंग लागला.

Two murders in Amalner disrupt the peace of the lockdown | अमळनेरात दोन खुनांमुळे लॉकडाऊनच्या शांततेचा भंग

अमळनेरात दोन खुनांमुळे लॉकडाऊनच्या शांततेचा भंग

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनला महिना झाल्यानंतरचे चित्रचोऱ्या, अपघात, कौटुंबिक कलह, मारामाºया नियंत्रणात

संजय पाटील
अमळनेर, जि.जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन झाल्यामुळे चोºया, अपघात, कौटुंबिक कलह, मारामाºया नियंत्रणात आल्या. सर्वत्र आनंद शांतता असताना मात्र अमळनेरात १५ दिवसांनंतर दोन सराईत गुन्हेगारांच्या खुनामुळे शांततेला सुरुंग लागला. या घटना वगळता पुन्हा मात्र कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली.
२२ मार्चला जनता कर्फ्यू लागला. सर्वत्र बंद झाल्याने सुरुवातीचे १५ दिवस लोक आपल्या घरातच थांबू लागले. पोलीस फक्त दिवस रात्र गस्तीवर राहू लागले. त्यामुळे चोरटेदेखील घरातच थांबू लागले. परिणामी द्वेष, मारामाºया, घरफोडी, चोºया, महिलांची छेडछाड आदी प्रकार थांबले. गुन्हेगारी बंद झाल्याने रामराज्य सुरू असल्याचा अनुभव आला. मात्र न्यायालयाने कोरोनाच्या पाशर््वभूमीवर काही आरोपींना पॅरोलवर सोडले आणि राकेश वसंत चव्हाण हादेखील जेलमधून बाहेर आला आणि त्याला त्याच्या मैत्रिणीने होत असलेल्या त्रासाची तक्रार केली आणि चिडलेल्या राकेशने आपल्या भावासह ख्वाजा नगरमध्ये जाऊन वाद घातल्याने संतप्त जमाव अंगावर आला आणि त्यातून दगडफेक, जातीय दंगल झाली आणि सामूहिक मारहाणीत राकेशचा मृत्यू झाला. ही घटना होत नाही तोच तिसºया दिवशी कुर्हे खुर्द गावात रवींद्र पाटील नामक खुनाची शिक्षा भोगून आलेला गुन्हेगार आला. त्यानेदेखील गावात आपल्या नातेवाईकांशीच भांडणे उकरून काढू लागला होता. म्हणून अखेर जमाव जमला आणि त्यांनीही रवींद्रवर सामूहिक हल्ला चढवला. गंभीर जखमी झालेल्या रवींद्रचा उपचार घेताना मृत्यू झाला. या दोन्ही घटनांनी लॉकडाऊनमधल्या शांततेला सुरूंग लावला.

लॉकडाऊनमुळे पालक आपल्या मुलांना कुटुंबांना वेळ देऊ लागले. कुटुंबात सुसंवाद झाला तर गुन्हेगार घरात दडून बसल्याने चोºया, घरफोड्या, वाद, भांडणे थांबून कायदा व सुव्यवस्था उत्तम झाली. वाहतूक बंद झाल्याने अपघाताचे प्रमाण शून्यावर आले आणि बाहेरील लोकांनाही प्रवेश नसल्याने गुन्हे घडणे थांबले. -अंबादास मोरे, पोलीस निरीक्षक, अमळनेर

Web Title: Two murders in Amalner disrupt the peace of the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.