शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

वाकडी प्रकरणात आणखी दोन जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 1:14 PM

रामदास आठवले यांची वाकडी येथे भेट

पहूर, जि. जळगाव - वाकडी येथे अल्पवयीन मुलांना मारहाण प्रकरणी शुक्रवारी मध्यरात्री अजित कासम तडवी व शकूर सरदार तडवी (दोघे रा. वाकडी, ता. जामनेर) या दोन जणांना पहूर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या चार झाली आहे. दरम्यान, केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले, माजी राज्यमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी शनिवारी वाकडी येथे भेट दिली.वाकडी येथे विहीरीत पोहल्याच्या कारणावरुन संबंधित विहिरीचा मालक ईश्वर जोशी व नोकर प्रल्हाद लोहार यांनी मातंग समाजातील दोन अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण करत त्यांची गावातून नग्न धिंड काढली होती. रविवारी घडलेल्या या आमानुष घटनेचा व्हिडिओ गुरुवारी सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेची वाच्यता फुटली. या घटनेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. त्यानंतर शनिवारी आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.वाकडी भेटीदरम्यान रामदास आठवले यांनी मारहाण झालेल्या मुलांना प्रत्येकी एक लाखाची मदत जाहीर केली. तसेच वैयक्तिक २५ हजार रुपयांची मदत त्यांनी दिली. ही घटना निंदणीय असून यात राजकारण करू नये, असे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव