शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातानंतर दुचाकीस्वाराला लुटणारे दोन जण पोलिस कोठडीत; दोघांचा शोध सुरू

By विजय.सैतवाल | Updated: August 18, 2023 15:39 IST

दोघांना न्यायालयात हजर केले असता न्या. सुवर्णा कुलकर्णी यांनी चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

जळगाव : दुचाकी अपघातानंतर तारीक अलताफ खाटीक (२३, रा. गुलाब बाबा कॉलनी) यांना मारहाण करून त्यांचा मोबाईल व इतर साहित्य, रोख रक्कम घेऊन फरार झालेल्या चार जणांपैकी दोन जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

१५ ऑगस्ट रोजी सायंकाळी तारीक अलताफ खाटीक (२३, रा. गुलाब बाबा कॉलनी) हे त्यांच्या दुचाकीने मेहरुण ट्रॅकवर जात असताना दुचाकीने (एमएच १९, डीयू ४६१०) धडक दिली होती. अपघात करणाऱ्या व त्यांच्या सोबत दुचाकीवर असलेल्या एकूण चार जणांनी तारीक खाटीक यांना अपघाताच्या कारणावरुन मारहाण करुन २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल, ५०० रुपये किमतीचे ब्ल्यू टुथ, एक हजार रुपये किमतीचे मनगटी घड्याळ व रोख ६०० रुपये असा एकूण २७ हजार १०० रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने घेऊन पळून गेले होते. या प्रकरणीचार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे हा गुन्हा रामेश्वर कॉलनी परिसरातील काही तरुणांनी केला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार राहुल नाना राजपूत (२३) रितेश भिकन चौधरी (१८) दोन्हा रा. रा. रामेश्वर कॉलनी यांना ताब्यात घेतले. त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरेलील दुचाकी, मोबाईल जप्त करण्यात आला. या दोघांसोबत असलेले दोन जण फरार असून त्यांचा शोध सुरु आहे. 

सदरची कारवाई पोलिस निरीक्षक जयपाल हिरो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक रवींद्र गिरासे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ इम्रान बेग, सचिन मुंढे, रामकृष्ण पाटील, इम्रान सैय्यद , सुधीर साळवे, किशोर पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी यांनी केली. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्या. सुवर्णा कुलकर्णी यांनी चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. 

 

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिसCourtन्यायालय