शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विमानतळावर मुक्त संचार करणारे दोन बिबटे अखेर ‘पिंजऱ्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 11:59 IST

पहाटे ३ वाजता एकाच पिंजºयात अडकले: महिनाभरापासून सुरू होती वनविभागाची मोहीम; विमानतळही होते बंद

जळगाव : जळगाव विमानतळावर मुक्त संचार करणारे आणि पिंजरा लावूनही वनविभागाला हुलकावणी देणारे दोन बिबटे शुक्रवार, १४ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास एकाच पिंजºयात अडकले. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीची सुटकेचा निश्वास सोडला आहे. या बिबट्यांमुळे महिनाभरापासून विमानतळही बंद ठेवण्यात आले होते.जळगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या जळगाव विमानतळ परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार सुरू होता. सप्टेंबर २०१८ मध्ये विमानतळावर खोदकाम सुरु असताना बिबट्याचा एका बछड्याचा मृत्यू झाला होता. तसेच ८ आॅक्टोबर २०१८ रोजी बिबट्यामुळे मुख्यमंत्र्यांचे विमान उतरवण्यासाठी सीएमओ आॅफीसने विमानतळ प्रशासनाकडून संपूर्ण माहिती व सुरक्षेविषयीची पडताळणी केल्यानंतरच विमान उतरविण्यासाठी परवानगी दिली होती. त्यानंतर ३० एप्रिल रोजी पुन्हा दोन बिबट्यांचा मुक्तसंचार सुरू असल्याचे निदर्शनास आल्यामुळे भिती वाढली होती. परिणामी विमानतळ बंद ठेवण्यात आले होते. विमानतळाचा सुमारे ७५० एकरचा परिसर असल्याने त्यात कॅमेरा ट्रॅप लावूनही बिबट्या लवकर हाती लागणे अवघड होते. तरीही ११ मे रोजी वनविभागाने एक बिबट्या पकडून सुरक्षित ठिकाणी सोडला होता. मात्र विमानतळावर प्रवेशासाठी अनेक ठिकाणी चोरवाटा असल्याने बिबट्या पुन्हा विमानतळावर दाखल झाला होता.जलसंपदामंत्र्यांनीही केली होती पाहणीबिबट्यांच्या संचारामुळे विमानतळ बंद असल्याचे आढावा बैठकीत समजल्याने जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार स्मिता वाघ, यांच्यासह पदाधिकाºयांनी विमानतळावर जाऊन पाहणी केली होती. विमानतळ प्राधिकरणाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तसेच वनविभागाने लावलेल्या कॅमेºयांमध्ये बिबटे कैद झाल्याचे दिसून आले होते.दोन पिंजरे लावूनही देत होते चकवाजळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक डी.डब्ल्यू. पगार यांनी वरिष्ठ कार्यालयाला याबाबत कळवून बिबटे पकडण्यासाठी मागितलेली परवानगी मिळाल्याने त्यांच्या मार्गदशर््ानाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी एन.जी.पाटील यांनी वनपरिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी तसेच मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई यांच्या मदतीने दोन पिंजरे लावले होते. मात्र विमानतळाचा परिसरच ७५० एकरचा असल्याने बिबटे पिंजºयात सापडत नव्हते. अखेर शुक्रवार १४ रोजी पहाटे ३ वाजता हे दोन्ही बिबटे एकाच पिंजºयात अलगद अडकले. त्यांची पशुवैद्यकीय अधिकारी संजय खाचणे यांनी तपासणी केली. त्यात दोन्ही बिबटे सृदृढ असल्याचे व त्यांना कोणतीही ईजा झाली नसल्याचे आढळून आले. आता या बिबट्यांना कुठ सोडायचे? याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारJalgaonजळगाव