आॅनलाईन लोकमतमुक्ताईनगर,दि.३ : तालुक्यातील वाढोदा वनपरिक्षेत्रात बुद्धपूर्णिमेच्या रात्री करण्यात आलेल्या प्राणी गणनेत दोन पट्टेदार वाघांचे दर्शन झाले आहे. एकूण १४ हजार हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या जंगलात १० निरीक्षण मनोरे उभारून करण्यात आलेल्या प्राणी गणनेत १ हजार ७०५ वन्यजीव दिसून आले आहेत.नैसर्गिक आणि कृत्रिम पाणवठ्यांजवळ निरीक्षण मनोरे, मचाण बांधून प्राणी गणना करण्यात आली. ती सोमवार ते मंगळवार सकाळी ७ या वेळेत पार पडली.वाघांचा अधिवास कायमवन परिक्षेत्रात सहा पट्टेदार वाघांचा अधिवास या पूर्वी निष्पन्न झाला आहे. अलीकडे मार्चमध्ये पट्टेदार वयोवृध्द वाघीण मृत्यू पावली होती. दरम्यान, प्राणी गणने दरम्यान दोन पट्टेदार वाघ आढळले आहेत. वाघांचा अधिवास कायम असल्याचे सातत्याने दिसून येत आहे.वन्य प्राण्यांनी समृद्ध वन परिसरप्राणी गणनेत वाघ २, तडस- ४, भेकर- १०७, अस्वल -५ , रानकुत्र -७ , जंगली मांजर १४, रानडुकर- ३२०, काळवीट-७५, चितळ ३८२, सांबार -६ मुंगूस १७, कोल्हे- १४, लांडगे-९, नीलगाय - ४१९, चिंकरा- १७, उद मांजर -८,सायाळ- ४, ससे- २४, मोर- ८२, माकड- १२६ यासह दूर्मिळ पक्षी - ६०, अशा एकूण १ हजार ७०५ वन्यजीवांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. यात अनेक दुर्मीळ वन्यजीव आहेत.
वढोदा वनपरिक्षेत्रात दोन पट्टेदार वाघांचा अधिवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 22:26 IST
प्राणी गणनेत आढळला १ हजार ७५० वन्यजीवांचा वावर
वढोदा वनपरिक्षेत्रात दोन पट्टेदार वाघांचा अधिवास
ठळक मुद्देप्राणी गणनेत आढळले १ हजार ७०५ वन्यजीववन्य प्राण्यांनी समृद्ध वन परिसरपट्टेदार वाघांचा अधिवास कायम