शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची दुचाकीला धडक दोघे जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 22:36 IST

चिंचगव्हाण फाटा ते खडकीसीम दरम्यान दत्त मंदिरासमोर खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देचिंचगव्हाण फाटा ते खडकीसीम दरम्यानची घटनाखड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात झाला अपघात

मेहुणबारे, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव-धुळे रस्त्यावरील चिंचगव्हाण फाटा ते खडकीसीम दरम्यान दत्त मंदिरासमोर खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने रविवारी दुपारी तीनला ही घटना घडली. महामार्गावरील खड्डे हे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहेत.चाळीसगावकडून घरी जाणाऱ्या चिंचगव्हाण, ता.चाळीसगाव येथील तरुणांच्या दुचाकीला मार्बल घेऊन जाणाºया ट्रकने खड्डे चुकविण्याच्या नादात जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, धडकेत दोन्ही तरुण जागीच ठार झाले. ट्रक रस्त्याच्या कडेला उलटली असून, ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.मेहुणबारे, ता.चाळीसगाव येथून चिंचगव्हाण येथे घरी दुचाकी (क्रमांक एमएच-१९-एझेड-३४०९) हिच्यावरुन दीपक रघुनाथ निकम (वय २१) व अमोल राजेंद्र वाघ (वय २१) हे घरी जात होते. घरी जात असताना त्यांच्या दुचाकीला धुळ्याकडून चाळीसगावकडे मार्बल घेऊन जाणाºया ट्रक (क्रमांक एमएच-१८-एए-८१४७) भरधाव वेगात जात होती. चिंचगव्हाण फाटा ते खडकीसीम दरम्यान असलेल्या रस्त्यावर दत्त मंदिरासमोर ट्रकने दुचाकीला समोरून धडक देत उडविले. या धडकेने दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती मेहुणबारे पोलिसांना समजताच घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी चाळीसगाव रवाना करण्यात आले. याप्रकरणी विनोद पाटील यांनी माहिती दिली. त्यावरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातChalisgaonचाळीसगाव