शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पारोळ्याजवळील अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 19:29 IST

पारोळा येथील सत्यनारायण मंदिराजवळ शेवगे प्र.ब येथून पारोळ्याकडे येणाऱ्या मोटरसायकलला जळू ता.एरंडोल येथील पिक अप वाहनाने धडक दिल्याने दोन ठार व एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कपारोळा : येथील सत्यनारायण मंदिराजवळ शेवगे प्र.ब येथून पारोळ्याकडे येणाऱ्या मोटरसायकलला जळू ता.एरंडोल येथील पिक अप वाहनाने धडक दिल्याने दोन ठार व एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.शेवगे प्र.ब.येथील मीराबाई राजेंद्र महाजन या पती राजेंद्र धर्मा महाजन व तामसवाडी येथील कारागीर विजय नान्हू बेलदार यांच्यासह पारोळा येथे दातांच्या उपचारा साठी मोटरसायकल क्रमांक एम.एच १९ डब्लू ९६४६ ने येत होते. या दरम्यान समोरून येणाºया पिक अप जीप क्रमांक एम एच १९ बी.एम.३३२७ ने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात राजेंद्र धर्मा महाजन व विजय बेलदार हे जागीच ठार झाले तर मीराबाई यांच्या पायाला व डोक्याला जबर मार बसला आहे. त्यांच्यावर पारोळा येथे डॉ.योगेश साळुंखे यांच्याकडे प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे.दातांच्या उपचारासाठी जात असताना झाला अपघातमहाजन कुटुंब विजय बेलदार यांच्या मोटरसायकलवर ट्रिपल सीट बसून पारोळा येथे दाताच्या उपचारासाठी येत होते. या दरम्यान हा अपघात झाला.शेतकरी धावले मदतीलाअपघातानंतर आजू बाजूच्या शेतातील शेतकरी, वाहन चालक यांनी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मयताना बाहेर काढले. यावेळी दोन्ही मयत हे पिक अप वाहनाच्या मध्यभागी अडकल्याने ग्रामस्थांनी वाहन उलटे करून त्यांना बाहेर काढले. गंभीर जखमी मीराबाई यांना त्वरीत दुसºया वाहनाने रुग्णालयात हलविले.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस