शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जामनेरला खोदलेल्या रस्त्यात वाहन उलटल्याने ४०० कोंबड्या मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 16:37 IST

भुयारी गटारीसाठी खोदलेला रस्ता रात्री बुजल्यानंतर सकाळी जलवाहिनी फुटल्याने माती वाहून गेली व खड्डा तसाच राहिल्याने त्यात पीकअप व्हॅन पडल्याने त्यातील ४०० कोंबड्या मृत्युमुखी पडल्याची घटना सोमवारी पहाटे पाचला येथे घडली.

ठळक मुद्देजलवाहिनीचा खड्डा पाणी घुसल्याने झाला भुसभुशीत अन् वाहन फसलेयाच ठिकाणी दोन ट्रॅक्टर फसल्याने काही काळ वाहतूक ठप्प

जामनेर, जि.जळगाव : भुयारी गटारीसाठी खोदलेला रस्ता रात्री बुजल्यानंतर सकाळी जलवाहिनी फुटल्याने माती वाहून गेली व खड्डा तसाच राहिल्याने त्यात पीकअप व्हॅन पडल्याने त्यातील ४०० कोंबड्या मृत्युमुखी पडल्याची घटना सोमवारी पहाटे पाचला येथे घडली.शहरातील अराफत चौकात भुयारी गटारीच्या कामासाठी रस्त्याचे खोदकाम होत आहे. रविवारी ठेकेदाराने रस्ता खोदून गटारीचे पाईप टाकले. त्यानंतर माती टाकून बुजण्यात आले. त्यापुढे खोदण्यात आलेल्या रस्त्याला लागून जलवाहिनी आहे. सोमवारी सकाळी नळाला पाणी सोडण्यात आल्यानंतर जलवाहिनी फुटली व जो खड्डा रविवारी मातीने बुजला होता. त्यात पाणी शिरल्याने वरील भाग भुसभुशीत झाला. सकाळी त्या रस्त्यावरून मालेगाव येथून कोंबड्या घेऊन येत असलेली पीकअप व्हॅन फसल्याने उलटली व त्याखाली दबल्याने सुमारे ४०० कोंबड्या मरण पावल्या.शेख कामिल (राहणार अजिंठा ) यांचे हे वाहन असून, सुमारे ७० हजारांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर याच ठिकाणी दोन ट्रॅक्टर फसल्याने काही काळ वाहतूक बंद पडली.दरम्यान, गांधी चौक ते जुना बोदवड नाक्यापर्यंतच्या रस्त्यावर दुभाजक टाकले असून, एक बाजू अतिक्रमणामुळे गेल्या १० वर्षांपासून बंद आहे. परिणामी एकेरी वाहतूक होत आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यावरील अतिक्रमणात वाढ होत आहे. तलाठी कार्यालयाजवळ पालिकेने प्रवेशद्वारावर अवजड वाहनांना प्रवेश बंदीचा फलक तीन वर्षांपासून लावला आहे. मात्र तो केवळ शोपीस ठरत आहे. पालिकेने या ठिकाणी अवजड वाहन बंदीसाठी कार्यवाही करण्याबाबत ठरावदेखील केलेला आहे. मात्र कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातJamnerजामनेर