शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील अक्सा नगरात दोन गटात तुफान हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 20:21 IST

माजी नगरसेवकासह पाच जखमी : परस्परविरोधी २८ जणांविरुध्द गुन्हे दाखल

जळगाव : मेहरुणमधील अक्सा नगरात रविवारी सायंकाळी पिरजादे व कुरेशी दोन गटात तुफान हाणामारीची घटना घडली. यात लोखंडी सळई व कुºहाडीचा वापर झाला असून दगडफेकही झाली. या घटनेत अनिस कुरेशी अब्दुल सत्तार कुरेशी (२७) त्याची आई हबीबाबी कुरेशी, पत्नी शगुप्ता व भाचा कमरेन बिलाल अहमद असे चार तर दुसऱ्या गटातील माजी नगरसेवक इकबालोद्दीन पिरजादे हे जखमी झाले आहेत. दरम्यान, पिरजादे व कुरेशी गटाच्या २८ जणांविरुध्द प्राणघातक हल्ला व दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.नगरसेवक इकबालोद्दीन जियाउद्दीन पिरजादे, दारा इकबालोद्दीन पिरजादे, बबल्या, राजू पिरजादे, सोहेल पिरजादे, मुजाहीद्दीन जहांगीरदार, कपील मुजाहीद जहांगीरदार, जबीिपरजादे, मुन्नवर पिरजादे, रउफ माजीद, माजीद मिया, दानिश धन्नो, रहीम दादा व जावेद हाफिस यांच्याविरुध्द प्राणघातक हल्ला व दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.हप्ता आणि गुरे चोरीचा आरोपया घटनेत दोन्ही गटांनी एकमेकावर आरोप केला आहे. कुरेशी गटाने पिरजादे यांच्यावर हप्तखोरीचा तर पिरजादे यांनी कुरेशी गटावर गुरे चोरीचा आरोप केला आहे.अनिस कुरेशी याने दिलेल्या फिर्यादीनुसार मटण विक्री करण्यासाठी नगरसेवक इकबालोद्दीन पिरजादे यांनी हप्ता व मोफत मटणाची मागणी केली, ते दिली नाही तर गुरे चोरीची खोटी केस दाखल करेल असे धमकाले. त्यास नकार दिला असता वरील १४ जणांनी मारहाण करायला सुरुवात केली. दारा पिरजादे याने डोक्यात कुºहाड टाकली तर इतरांनी लोखंडी सळई व दगडीचा मारा केल्याने कुटुंबातील चार जण जखमी झाल्याचे म्हटले आहे.इकबालोद्दीन जियाउद्दीन पिरजादे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी दुपारी आपल्या गुरांमधून एक जनावर चोरी गेले होते, त्यासाठी सत्तार शेख गफूर कुरेशी याच्या गोडावूनमध्ये पाहण्यासाठी गेलो असता तेथे कुरेशी याच्यासह त्याचा मुलगा रईस, अनिस, भाऊ मुख्तार, जब्बार असे होते तर भोल्या रशिद कुरेशी, जावेद रशिद कुरेशी, वसीम रशिद कुरेशी, अरबाज महेनूर कुरेशी, बाबु युसुफ कुरेशी, नाजीम कुरेशी, अब्रार मुख्तार कुरेशी, शेख अनिस शेख हयास जामनेरवाला आदी जण आले. त्यांनी आम्ही तुम्हाला चोर दिसतो का? असे म्हणत गोडावूनमध्ये जावू देण्यास नकार दिला. त्यावर पोलिसांना बोलावतो असे म्हटल्याचा राग आल्याने रईस व अनिस कुरेशी यांनी मटण कापण्याच्या सुºयाने हल्ला केला. तर बाकींच्यांनी काठी व दगड विटांचा मारा केला. दरम्यान, या सर्वाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव