शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बोदवड मुख्याधिकाऱ्यांच्या अंगावर दोघे आले धावून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 17:56 IST

चक्की सुरू करण्यासाठी नगरपंचायतीने ना हरकत दाखला न दिल्याने दोन जणांनी नगरपंचायतीत गोंधळ घातला. दोघे जण मुख्याधिकाऱ्यांच्या अंगावर धावून आले.

ठळक मुद्देचक्की सुरू करण्यासाठी मागणी केली होती ना हरकत दाखल्याची दाखल्याचीबोदवड नगरपंचायतीमधील सकाळची घटना

गोपाळ व्यासबोदवड, जि.जळगाव : चक्की सुरू करण्यासाठी नगरपंचायतीने ना हरकत दाखला न दिल्याने दोन जणांनी नगरपंचायतीत गोंधळ घातला. दोघे जण मुख्याधिकाऱ्यांच्या अंगावर धावून आले. बुधवारी सकाळी अकराला ही घटना घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सूत्रांनुसार, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले आपल्या दालनात होते. त्यावेळी नगराध्यक्षा मुमताज बी बागवान व त्यांचे पती सईद बागवान हेदेखील हजर होते. तेव्हा शहरातील शेख अकील शेख इमाम व त्याचा भाऊ शेख जावेद शेख इमाम हे दोन्ही जण आले व मुख्याधिकाºयांना उद्देशून म्हणाले, ‘साहेब, आम्ही चक्की सुरू करण्यासाठी ६ जुलै रोजी अर्ज दिला आहे. मात्र अद्याप ना हरकत दाखला का मिळाला नाही?’ यावर मुख्याधिकाºयांनी संबंधित विभागप्रमुख व कर्मचाºयांना विचारणा केली. तेव्हा अर्जात त्रुटी असून, अगोदरच सिंगल फेजच्या वीज जोडणीवर चक्की सुरू आहे, त्यामुळे ना हरकत दाखला दिला नसल्याचे मुख्याधिकाºयांनी सांगितले. याचा दोघांना राग आला व ते मुख्याधिकाºयांना शिवीगाळ करीत अंगावर धावून आले. तेव्हा उभ्या असलेल्या इतर कर्मचाºयांनी त्यांना रोखले.नंतर या दोघांना कर्मचाºयांनी समज देवून कार्यालयाबाहेर काढले. यावर कार्यालय अधीक्षक राजूसिंग चव्हाण, अमित कोलते, रितेश बच्छाव, जगताप व इतर कर्मचाºयांनी पोलीस ठाणे गाठले. मुख्याधिकाºयांनी फिर्याद दिली. त्यावरून शेख अकील शेख इमाम व त्याचा भाऊ शेख जावेद शेख इमाम या दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे व शिवीगाळ केल्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBodwadबोदवड