जळगाव : लोंबकळणाऱ्या वीज तारांचा स्पर्श झाल्याने दोन म्हशींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजता शिवाजी उद्यानातील जे.के.पार्क परिसरात घडली. दैव बलवत्तर म्हणून म्हशींचे मालक बचावले. दरम्यान, या घटनेवर आमची हद्द नसल्याचे सांगून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवून जबाबदारी टाळल्याचा आरोप नाना सजन हटकर (रा.तांबापुरा) यांनी केला. दरम्यान, चार महिन्यातील ही दुसरी घटना आहे. याआधी देखील वीजेच्या धक्क्याने एका म्हशीचा मृत्यू झाला होता.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडू बाबुराव हटकर हे रविवारी जे.के.पार्क परिसरात म्हशी चारायला गेले होते. तेथे इलेक्ट्रीक पोलजवळ जमिनीलगत लोंबकळत असलेल्या तारांचा दोन म्हशींना स्पर्श झाला. विद्युत प्रवाह सुरु असल्याने म्हशी जमिनीवर कोसळल्या. दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्याने खंडू हटकर म्हशी वाचविण्यासाठी गेले असता त्यांनाही विजेचा धक्का बसला आणि ते बाजूला फेकले गेले. त्यानंतर म्हशींचा काही क्षणात जागेवर मृत्यू झाला.जबाबदारी झटकलीयाच परिसरात चार महिन्यापूर्वी आबा नाना हटकर यांच्या मालकीच्या म्हशीचा वीज तारांच्या स्पर्शाने मृत्यू झाला होता. तेव्हाच लोबंकळत असलेल्या तारांबाबत दखल घेतली असती तर कदाचित ही घटना टळली असती. आता आणखी घटनेची वाट पाहिली जात आहे का? असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.यावेळी काही जणांनी महावितरण कार्यालयातकडे तक्रार केली असता ती आमची हद्द नाही,असे सांगून कर्मचारी तसेच अधिकाºयांनी कानावर हात ठेऊन कोणतीही दखल घेतली नव्हती,असा आरोप आबा हटकर यांनी केला.
वीजतारांच्या स्पर्शाने दोन म्हशी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 22:32 IST