शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शिव कॉलनी स्टॉपवरील एटीएम फोडणाऱ्या दोघांना हरियाणातून घेतले ताब्यात ; मुख्य संशयित अद्याप फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 13:02 IST

जळगाव : शिव कॉलनी उड्डाणपुलाजवळील स्टेट बॅँकेचे एटीएम फोडणाºया दोन जणांना हरियाणा पोलिसांनी पकडले असून या दोघांना ताब्यात घेण्याच्या ...

जळगाव : शिव कॉलनी उड्डाणपुलाजवळील स्टेट बॅँकेचे एटीएम फोडणाºया दोन जणांना हरियाणा पोलिसांनी पकडले असून या दोघांना ताब्यात घेण्याच्या दहा मिनिटे आधीच मुख्य संशयित फरार झाला आहे. दरम्यान, या दोघांना जळगाव पोलिसांनी फरीदाबादमधील निमका कारागृहातून हस्तांतर करुन ताब्यात घेऊन बुधवारी शहरात आणले.निसार शफुर सैफी (३८) आणि त्याचा लहान भाऊ इरफान शफुर सैफी (२९, रा. पलवल, हरियाणा) अशी दोघांची नावे आहेत. यातील तिसरा मुख्य सुत्रधार खुर्शीद मदारी सैफी (रा.अंघोला ता.पलवल, हरियाणा) हा फरार आहे.महामार्गाला लागून असलेले एटीएम चोरट्यांनी गॅस कटरने कापून त्यातील १४ लाख ४१ हजार ५०० रुपयांची रोकड लांबविल्याची घटना १२ जुलै रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.संशयित सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले होते. दरम्यान, गुन्हा घडल्यापासून जळगाव पोलीस या चोरट्यांच्या मागावर होते. फुटेज व त्यांचे छायाचित्र व्हायरल करण्यात आले होते.हरियाणा पोलिसांकडे त्यांनी जळगावात एटीएम फोडल्याची कबुली देवून साडे सात लाख रुपये देखील या दोघांनी काढून दिल्याचे सांगितले जात आहे,मात्र त्याला अधिकृत दुजोरा पोलिसांनी दिलेला नाही. हरियाणा पोलिसांनी जळगाव पोलिसांशी संपर्क साधून आरोपींची माहिती दिली. त्यानुसार जळगाव पोलिसांनी या दोघांना कारागृहातून ताब्यात घेतले.खुर्शीदच्या शोधात फुटले बींग, रस्त्याने जाताना केली रेकी1. खुर्शीद हा हरियाणा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने तेथील पोलीस त्याच्या मागावर होते. खुर्शीद याच्या घरी जावून चौकशी केली असता तो निसार व इरफान या दोघं भावांसोबत कंटेनरवर कामाला गेल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांकडून पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे हरियाणा पोलीस त्याच्या मागावर होते. तांत्रिक माहितीच्या आधारावर खुर्शीदची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचला, मात्र त्याची कुणकुण लागल्याने तो या दोघांना सोडून निसटला. माहितीच्या आधारावर पोलिसांनी कंटेनर अडवून दोघांची चौकशी केली असता खुर्शीद हा दहा मिनिटापूर्वीच आमच्यातून गेल्याची माहिती या दोघांनी पोलिसांना दिली. तो फरार होण्यात यशस्वी झाल्याने पोलिसांनी या दोघांची चौकशी केली असता जळगाव शहरात तिघं मिळून एटीएम फोडल्याची कबुली दोघांनी दिली.2. तिघं जण कोलकाता येथून मुंबईला जात असताना हे एटीएम फोडणे सहज शक्य असल्याने त्याचे नियोजन केले व परत मुंबई येथून कोलकाता जाताना १२ जुलैच्या मध्यरात्री त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून हेतू साध्य केला. यातील खुर्शीद हा सराईत असून त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत तर इरफान हा वेल्डींगचे काम करीत असल्याने त्याला त्याचे ज्ञान होते. त्यामुळे कुरशीदने हा सापळा रचला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव