शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
3
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
4
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
5
नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या
6
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
7
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
8
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
9
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
10
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
11
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
12
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
13
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
14
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
15
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
16
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
17
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
18
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
19
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
20
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया

प्राणघातक हल्ला प्रकरणात अडीच वर्ष कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 18:22 IST

शेतात जाणा-या तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणात आरोपी प्रभाकर दशरथ पाटील (६६, रा.घुमावल, ता.चोपडा) याला न्यायालयाने गुरुवारी अडीच वर्ष सश्रम कारवास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए.सानप यांनी हा निकाल दिला. दरम्यान, या खटल्यात अनेक महत्वाचे साक्षीदार फितूर झाले होते हे विशेष !

ठळक मुद्देन्यायालयाचा निकाल  अनेक महत्वाचे साक्षीदार फितूर

जळगाव : शेतात जाणा-या तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणात आरोपी प्रभाकर दशरथ पाटील (६६, रा.घुमावल, ता.चोपडा) याला न्यायालयाने गुरुवारी अडीच वर्ष सश्रम कारवास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए.सानप यांनी हा निकाल दिला. दरम्यान, या खटल्यात अनेक महत्वाचे साक्षीदार फितूर झाले होते हे विशेष !या गुन्ह्यातील फिर्यादी सुधाकर रतन पाटील हे १६ आॅक्टोबर २००८ रोजी सोनवद, ता.धरणगाव येथील त्यांच्या शेतात बैलगाडीने जात असताना त्यांचा मुलगा प्रभाकर व कृष्णा समोरुन येत होते. त्यावेळी प्रभाकर दशरथ पाटील याने प्रभाकर सुधाकर पाटील याला अडवून डोक्यात मागील बाजुस सुºयाने गंभीर दुखापत केली तर योगराज दशरथ पाटील याने कृष्णा आनंदा पाटील याला सळईने मानेवर तर मृत आरोपी तानकु दौलत पाटील याने कुºहाडीने सुपडू पाटील व माधवराव पाटील यांना डोक्यावर, पायावर व खांद्यावर मारुन दुखापत केली होती. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.जखमीनेच दिली साक्षतपासाधिकारी आर.बी.देशमुख यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.या खटल्यात सरकारतर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारपक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन या खटल्यात फक्त जखमी साक्षीदार प्रभाकर सुधाकर पाटील यानेच आरोपीविरुध्द साक्ष दिली. इतर साक्षीदार फितूर झाले. इतर साक्षीदार गजानन पोपट सावंत, आत्माराम बंडू भोई, वैद्यकिय अधिकारी डॉ.अरविंद वानखेडे, डॉ.मिलिंद कोल्हे व तपासाधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. आरोपी प्रभाकर पाटील यास कलम ३२६ अंतर्गत दोषी धरण्यात आले. सरकारतर्फे अ‍ॅड.संभाजी जाधव व अ‍ॅड.निलेश चौधरी यांनी तर आरोपीतर्फे अ‍ॅड.हिंमत सूर्यवंशी यांनी कामकाज चालविले.

टॅग्स :Courtन्यायालयJalgaonजळगाव