शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या गुणपत्रिकांचे शुक्रवारपासून विद्यार्थ्यांना होणार वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 21:13 IST

शिक्षण विभाग : गुरूवारी जिल्ह्यातील ४ केंद्रांवर होणार महाविद्यालयांना

जळगाव : नाशिक विभागीय मंडळ कक्षेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च परक्षेच्या (इयत्ता बारावी) कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे गुणपत्रिका व इतर साहित्य जिल्ह्यातील ४ वितरण केंद्रांवर गुरूवार, ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवारपासून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाटप केल्या जाणार आहे.पुणे शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्राची परीक्षा फेब्रुवारी- मार्चमध्ये घेण्यात आली. परीक्षेचा निकाल नुकताच आॅनलाईन जाहीर झाला असून त्यात जळगाव जिल्ह्याचा निकाल ८९.७२ टक्­के लागला आहे. यंदाही निकालात मुलीच अव्वल ठरल्या आहेत़ बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर धावपळ सुरू होते ती पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची़ मात्र, मुळ गुणपत्रिकाचं न मिळाल्यामुळे सध्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांना तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश देण्यात येत आहे़ मुळ गुणपत्रिका महाविद्यालयात जमा करताचं, प्रवेश निश्चित केले जाणार आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांची प्रतीक्षा होती़ ती प्रतीक्षा आता संपली असून शुक्रवार, ३१ जुलैच्या दुपारी ३ वाजेपासून विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेचे वाटप केले जाणार आहे़ दरम्यान, गुणपत्रिका वाटप करत असताना कुठलीही गर्दी होणार नाही, याची काळजी महाविद्यालयांना घ्यावी, तसेच सोलश डिस्टन्सिंग पाळण्यात याव्या, आदी सूचना नाशिक विभागीय मंडळाकडून देण्यात आली आहे़.या केंद्रांवर होणार महाविद्यालयांना गुणपत्रिका वितरणजिल्ह्यातील चार केंद्रांवर गुणपत्रिकांचे महाविद्यालयांना वितरण केले जाणार आहे़ त्यानंतर शुक्रवारी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाटपाला सुरूवात होईल़ गुरूवारी सकाळी ११ ते ३ या वेळात चारही वितरण केंद्रांवर गुणपत्रिका महाविद्यालयांना सोपविण्यात येणार आहे़ जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, धरणगाव, एरंडोल तालुक्यांमधील कनिष्ठ महाविद्यालयांना जळगाव शहरातील जिल्हा परिषद विद्यानिकेतन विद्यालयात तसेच भुसावळ, बोदवड, जामनेर मुक्ताईनगर, रावेर, यावल तालुक्यातील महाविद्यालयांना भुसावळमधील के ़नारखेडे, विद्यालय येथे तर चाळीसगाव, भडगाव पाचोऱ्यातील महाविद्यालयांसाठी चाळीसगावातील अ‍े़बी़हायस्कूल हे वितरण केंद्र असणार आहे़ त्याचबरोबर अमळनेर, चोपडा, पारोळा तालुक्यातील महाविद्यालयांसाठी अमळनेर येथील डी.आर. कन्या हायस्कूल वितरण केंद्र असणार आहे़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव