शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

बारावी सीबीएसई परीक्षेचा निकाल जाहीर ; अनेक शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा ठेवली कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 20:49 IST

जळगाव : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच अर्थात सीबीएसई बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाइन जाहीर झाला़ यात जळगाव शहरातील ...

जळगाव : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच अर्थात सीबीएसई बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाइन जाहीर झाला़ यात जळगाव शहरातील सेंट जोसेफ स्कूलची किमया चौधरी ही ९५. ६ टक्के मिळवून चमकली आहे़ विशेष म्हणजे, शहरातील अनेक शाळांनी शंभर टक्के निकालाची पंरपरा कायम ठेवली आहे़ दरम्यान, यंदा कोरोना व्हायरसच्या साथीमुळे सीबीएसई बारावी परीक्षेचा निकाल थेट संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.सेंट जोसेफची किमया चौधरी प्रथमशहरातील सेंट जोसेफ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बारावी सीबीएसई परीक्षेत यश मिळविले आहे़ यात किमया चौधरी हिने ९५.६ टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला आहे़ तर आदेश ओसवाल हा ९४.६ टक्के मिळवून द्वितीय तर सांरग मंडोरे ९४.२ टक्के गुण मिळवून तृतीय ठरला आहे़ओरियनचा भार्गव गुरवला ९५.४ टक्के गुणकेसीई सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मिडियम स्कूलच्या ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत यश संपादन केले आहे़ शाळेत इयत्ता बारावीच्या परीक्षेत भार्गव एस. गुरव या विद्यार्थ्याने ९५.४ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे़ तर ९५ टक्के गुण मिळवत श्याम पी.जाखेटे हा शाळेतून द्वितीय आला आहे़ नेहा पाटील या विद्यार्थिनीने ९१.२ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे व स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची व उपप्राचार्या माधवीलता सित्रा यांनी कौतूक केले आहे़पोदार स्कूलचा शंभर टक्के निकालकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात पोदार इंटरनेशनल स्कूलचा निकाल हा शंभर टक्के लागलाआहे़ यावर्षी विज्ञान शाखेतून १६ तसेच वाणिज्य शाखेतून ५ अश्या एकूण २१ विध्यार्थ्यानी इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती़ त्यामुळे यंदाही शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे़ यातराजेंद्र दिपक वारके ९४ टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेतून शाळेतून प्रथम क्रमांक तसेच वाणिज्य शाखेतून रिया रंजन सिंग हिने ८९ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे़मल्हार खडसे प्रथमगोदावरी सीबीएसई इंग्लिश मिडीअम स्कूलच्या बारावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात मल्हार खडसे हा विद्यार्थी ९२ टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम आलेला आहे. तर ओशिन जाधव ९० टक्के, पार्थ चौधरी ८५ टक्के, अक्षदा पाटील ८२ टक्के, सुमित पांडे ७६ टक्के, प्रणव महाजन ७५ टक्के, योगिता महाजन ७४ टक्के, हर्ष महाजन ७२.४ टक्के, अदिती खंदारे ६४ टक्के आणि प्रथम गरूड ६० टक्के अशी विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक कामगिरी केल्याने स्कुलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यासर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गोदावरी स्कुलचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, संचालिका डॉ. केतकी पाटील आणि प्राचार्या निलीमा चौधरी यांनी कौतुक केले आहे.रूस्तमजीमध्ये गरीमा जैन अव्वलरुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळवले आहे. यात गरिमा जैन हिने ९५.४ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर द्वितीय ईशा चौधरी ९५.२ टक्के तर श्रीनिधी तेली हीने ९४.४ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. शाळेतील ३० विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. यापैकी २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच परीक्षेत चिराग अग्रवाल ९४ टक्के, हर्षिता अग्रवाल ९२.८ टक्के, गौरी ढवळे ९१.८ टक्के, प्रीती वाघ ९१.६ टक्के, समय सोंजे ९१.६ टक्के गुण मिळवत विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव