शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात खोट्या कागदपत्राद्वारे विम्याची रक्कम लाटण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 12:41 IST

मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावाने विमा पॉलिसी

ठळक मुद्देएकास अटक१० लाख ५६ हजाराची काढली विमा पॉलिसी

जळगाव : मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावे खोटे कागदपत्र सादर करुन १० लाख ५६ हजार रुपयांची विमा पॉलिसी काढून ही रक्कम लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या राकेश गणेश रायचंदे (रा.जाखनी नगर, जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी अटक केली. दरम्यान, मयताची पत्नी व एजंट यांच्यासह पाच जणांचा समावेश आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सुभेदार सरदार तडवी (रा.कुंड्यापाणी, ता.चोपडा) यांचा मृत्यू २७ फेब्रुवारी २०१३ रोजी झालेला असताना मयताची पत्नी फातमा सुभेदार तडवी (रा.कुंड्यापाणी, ता.चोपडा), प्रतिक मेने, अजय राजपूत व अन्य दोघांनी सुभेदार तडवी हे २७ सप्टेंबर २०१३ रोजी मृत्यू झाल्याचे दाखवून त्यांच्या नावाने ४ हजार ८८९ रुपये मासिक हप्त्याची खासगी कंपनीची विमा पॉलिसी काढली. मृत्यू दाखला व अन्य कागदपत्रे बनावट सादर केले. मृत्यूचा लाभ म्हणून १० लाख ५६ हजार रुपयांचे प्रकरण सादर केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विमा कंपनीचे व्यवस्थापक हरीद्वार रामविलास सैनी (वय ३८, रा.भगवान नगर, जळगाव) यांनी अडावद पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरुन पत्नी फातमा हिच्यासह पाच जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.१० लाख ५६ हजाराची काढली विमा पॉलिसीव्यवस्थापक सैनी यांनी माहिती अधिकारात काढलेले पुरावे पोलिसात सादर केले. त्यात सुभेदार यांच्या विमा पॉलिसीचा अर्ज, सुभेदार यांचे पॅन कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला,बिडगाव ग्रामपंचायतीचा मृत्यू दाखला, विमा तपासल्याचा अहवाल आदी कागदपत्रे सादर केली.त्यानंतर पोलिसांनी पत्नी फातमा व अन्य तिघांना अटक केली होती. यातील पाचवा आरोपी राकेश रायचंदे हा फरार होता. तो जळगाव शहरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी हेडकॉन्स्टेबल शरद भालेराव, रामचंद्र बोरसे, रामकृष्ण पाटील, रमेश चौधरी व महेश पाटील यांचे पथक रवाना केले होते.या पथकाने दुपारी जाखनी नगरातच त्याला घेरले. स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणल्यानंतर सायंकाळी अडावद पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गजानन राठोड यांच्या ताब्यात त्याला देण्यात आले.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव