शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

अपयशाने खचून न जाता पुन्हा प्रयत्न करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 17:36 IST

पिनॅकल स्पर्धेचे समारोप : प्रा. ए.बी.चौधरी यांचे प्रतिपादन

जळगाव- अपयश हीच यशाची पहिली पायरी मानावी. अपयशाने खचून न जाता आपण पुन्हा प्रयत्न केल्यास पहिल्यापेक्षा जास्त किंबहुना अधिक असे उज्ज्वल यश मिळेल, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विज्ञान अधिष्ठाता प्रा. ए. बी. चौधरी यांनी केले.रायसोनी महाविद्यालया सुरू असलेल्या पिनॅकल स्पर्धेचा समारोप शुक्रवारी झाला़ त्याप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, शरद मोरे, बाबा मलिक, प्रा.रफिक शेख तसेच प्रा. कल्याणी नेवे आदींची उपस्थिती होती़ दोन दिवसीय सुरु असलेल्या माहिती व तंत्रज्ञानावर आधारित पिनॅकलया आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रश्नमंजुषा, संशोधन पेपर सादरीकरण, मनोरंजन व एकाग्रता वाढविण्यासाठी संगणक गेमिंग, पोस्टर्स प्रेझेंटेशन, सीप्लसप्लस प्रोग्रामिंग स्पर्धा पार पडल्यात. यात आयटी क्विज १२००, गेमिंग ६०, संशोधन पेपर ६०, पोस्टर्स प्रेझेंटेशन १५० व सीप्लसप्लस प्रोग्रामिंग मध्ये ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. संशोधन विषयात जीएसटी, डिजिटल इंडिया, कॅशलेस सोसायटी, जिओ प्रभाव, आयओटी या प्रमुख विषयांसह आदी विषय सादर करण्यात आलेत. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राज कांकरिया व राधिका वर्मा यांनी केले तर आभार प्रा. कल्याणी नेवे यांनी मानले.यांनी पटकाविले पारितोषिकआयटी क्विझ या स्पर्धेत प्रथम- मेहुल पाटील, भावेश कुवर, द्वितीय- यश कळसकर, पराग पाटील, तृतीय- निकिता वराडे, मोहिनी इंगळे, एन.एफ.एस.गेमिंगमध्ये प्रथम- शिवम लीबारे, द्वितीय-तुषार बारी, एमएम गेमिंगमध्ये प्रथम सय्यद झुबेर, फैझल मलिक, मुजताबा आहेरार, शिवम कुलकर्णी, द्वितीय- जालीस कुरेशी, सलमान खान, साहिल खाटिक, शादाब खान, सीएस गेमिंगमध्ये प्रथम ऋषभ कोटेचा, अक्षय देशमुख, चेतन देशमुख, कुणाल बोबडे, मिहीर अडवाणी, द्वितीय-यश पाटील, तेजस बागुल, संदेश आर्य, संजन दारा, ऋतिक वालेचा, पेपर प्रेझेन्टेशनमध्ये पदवी स्तरावर प्रथम- दानिश शेख, व्दितीय रुचिका बोरसे, उमा रामरख्या, तृतीय- नीरज पवार, मुनाझा शेख, रोशनी खान, पदव्युत्तर स्तरावर प्रथम- पियुष हासवाणी, सोमीनाथ गुंडाळे, पोस्टर प्रेझेटेशनमध्ये पदवी स्तरावर प्रथम- कोमल राजांनी, शिवानी वानखेडे, द्वितीय- अरुणा मेत्री, तृतीय खान मदिना, शेख मीना, पदव्युत्तर स्तरावर प्रथम- विशाल वाधवानी, जान्हवी पाटील, दीपश्री महाजन, सी. प्लस. प्लसमध्ये पदवी स्तरावर प्रथम- यदनेष वाणी, द्वितीय- पवन सोनार, तृतीय- आवेश लोहार, पदव्युत्तर स्तरावर प्रथम क्रमांक रजत सिंग याने पटकाविला़ या विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम या प्रमाणे परितोषिक देऊन गौरविण्यात आले़ 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव