शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीत प्रवेश करण्यापूर्वीच ट्रकने दुचाकस्वाराला उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 19:20 IST

कंपनीत प्रवेश करण्यासाठी महामार्गावरुन वळण घेत असताना भरधाव ट्रकने रवींद्रसिंग फतेसिंग वतपाल (५५, रा.शिवकॉलनी, जळगाव, मुळ रा.साकळी, ता.मलकापूर, जि.बुलडाणा) यांच्या दुचाकीला रविवारी सकाळी पावणे आठ वाजता महामार्गावर जैन इरिगेशन कंपनीसमोर मागून जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वतपाल यांचा दुपारी १ वाजता उपचार घेत असताना मृत्यू झाला.

ठळक मुद्दे जळगाव शहरानजीक महामार्गावर अपघात  कंपनीचे सुपरवायझर ठार

जळगाव : कंपनीत प्रवेश करण्यासाठी महामार्गावरुन वळण घेत असताना भरधाव ट्रकने रवींद्रसिंग फतेसिंग वतपाल (५५, रा.शिवकॉलनी, जळगाव, मुळ रा.साकळी, ता.मलकापूर, जि.बुलडाणा) यांच्या दुचाकीला रविवारी सकाळी पावणे आठ वाजता महामार्गावर जैन इरिगेशन कंपनीसमोर मागून जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वतपाल यांचा दुपारी १ वाजता उपचार घेत असताना मृत्यू झाला.वतपाल हे साकळी, ता. मलकापूर येथील मुळ रहिवासी असून पत्नी छाया यांच्यासोबत शिवकॉलनी येथे वास्तव्यास होते. मुलगा सुकेश हा पुण्यात कंपनीत नोकरीला आहे तर मुलगी सायली हिचा विवाह झाला असून ती सुध्दा पुण्यातच सासरी नांदते. छाया या जिल्हा परिषदेच्या चिंचोली शाळेत शिक्षिका आहेत.  वतपाल हे २८ वषार्पासून जैन इरिगेशन कंपनीत नोकरीला होते. 

रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शिवकॉलनी येथून दुचाकीने (एम.एच. १९ ए.ए.९५०२) कंपनीत जाण्यासाठी निघाले. कंपनीजवळ पोहचले असता महामार्गावरुन कंपनीत प्रवेश करण्यासाठी वळण घेणार तोच मागून पाळधीकडे जात असलेल्या तांदळाच्या भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. हा प्रकार लक्षात येताच कंपनीच्या कर्मचाºयांनी तातडीने धाव घेऊन त्यांना कंपनीच्याच रुग्णवाहिकेने खासगी दवाखान्यात दाखल केले. तेथे डॉक्टर उपलब्ध तेथून परत त्यांना दुसºया खासगी दवाखान्यात हलविण्यात आले.तेथे उपचार सुरु असताना दुपारी १.१२ वाजता त्यांची मृत्यूंशी झुंज संपली.

हेल्मेट असतानही गेला जीववतपाल हे नियमितप्रमाणे हेल्मेट घालूनच दुचाकीवरुन कंपनीत ये-जा करत होते. रविवारी जात असतांना त्याच्या डोक्यात हेल्मेट होते, मात्र हेल्मेट असतानाही नशिबाने साथ सोडली. अपघातात कमरेला दुखापत होवून वतपाल यांचा मृत्यू झाला.  अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांसह कंपनीच्या कर्मचाºयांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. पत्नी छाया यांचा आक्रोश मन हेलावणारा होता. घटनेची माहिती मुलांना कळविण्यात आली असून ते रात्री उशिरापर्यंत शहरात दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव