शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
2
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
3
सरकारचा एक निर्णय आणि सरकारी कंपनीलाच जोरदार झटका; २ दिवसांत झालं ११,००० कोटी रुपयांचं नुकसान, प्रकरण काय?
4
नेपाळमध्ये काळजाचा ठोका चुकला! ५५ प्रवाशांना घेऊन उतरणारे विमान धावपट्टीवरून घसरले
5
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
6
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
7
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
8
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
9
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
10
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
11
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
12
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
13
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
14
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
15
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
16
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
17
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
18
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
19
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
20
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
Daily Top 2Weekly Top 5

खरेदी-विक्री व्यवहारांच्या फेरफार नोंदी आता आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 21:53 IST

अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे विशेष मोहीम

ठळक मुद्दे दुय्यम निबंधक कार्यालयाकडून थेट तलाठ्यांकडे जाणार माहिती नागरिकांना तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही

जळगाव: दुय्यम निबंधक कार्यालयात झालेल्या खरेदी-विक्री व्यवहारांच्या नोंदणीकृत दस्तांनुसार सातबारा उताऱ्यावर फेरफार नोंदी तहसीलदार कार्यालयातील फेरफार कक्षामार्फत न करता थेट तलाठ्यामार्फत करण्याची योजना जमा बंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख पुणे यांनी आखली आहे. त्यासाठी ७/१२वर जानेवारी २०१८ पासूनच्या सर्व खरेदी-विक्री व्यवहारांची फेरफार नोंद घेण्याची विशेष मोहीम जिल्हा प्रशासनातर्फे १५ सप्टेंबर पासून राबविण्यात येणार आहे.अशी असेल मोहीम१५ सप्टेंबर २०१८ रोजी तहसिलदारांनी दुय्यम निबंधक यांच्याकडून जानेवारी २०१८ पासून ते आजपर्यंतच्या सर्व खरेदी विक्री व्यवहारांच्या सूची क्र.२ च्या प्रती प्राप्त करून घेण्यात येणार आहेत. १७ रोजी दुय्यम निबंधक यांच्याकडील सूची क्र.२ च्या प्रती तलाठी यांना देणे, १७ ते २० सप्टेंबर या कालावधीत सूची क्र.२ वरून संगणकीकृत फेरफार घेतला आहे की नाही? याची तलाठी यांनी तपासणी करणे. २१ ते ३० सप्टेंबर दरम्यान तपासणीअंती घेण्यात न आलेल्या सूची क्र.२ ची आकडेवारी संकलीत करून संगणकीकृत फेरफार घेऊन नियमानुसार कार्यवाही करणे, ३१ सप्टेंबर रोजी मंडळ अधिकारी यांनी सदर फेरफारांवर निर्णय घेऊन अंतिम कार्यवाही करणे, ३ नोव्हेंबर रोजी तहसिलदार यांनी तलाठी यांच्याकडून सदर फेरफारची माहिती संकलित करून जिल्हाधिकाºयांना अहवाल सादर करणे.अहवाल वेळेत सादर करण्याचे आदेशया कार्यक्रमाची क्षेत्रीयस्तरावर प्रभावी अंमलबजावणी करून जानेवारी २०१८ पासूनच्या एकाही खरेदी-विक्री व्यवहाराची संगणकीकृत फेरफार नोंद घेण्याचे प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. ही कार्यवाही ठरवून दिलेल्या मुदतीत पार पाडून मोहीम यशस्वी करण्याचे व त्याबाबत अहवाल वेळेत सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.फेरफार कक्ष होणार बंदजमाबंदी आयुक्तांनी १ जुलै २०१८ रोजी दिलेल्या आदेशनुसार तहसील कार्यालयातील फेरफार कक्ष बंद होणार असून दुय्यम निबंधक कार्यालयाकडून नोंदणीकृत झालेल्या दस्ताची माहिती थेट तलाठी लॉगइन उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. याची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यापूर्वी संगणकीकृत सातबारा अद्यावत व अचूक असणे आव श्यक असल्याने जानेवारी २०१८ पासून झालेल्या सर्व खरेदी विक्री व्यवहारांच्या फेरफार नोंदी त्यावर आहेत की नाही? हे तपासून त्याची पूर्तता करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.नागरिकांना तलाठ्याकडे जाण्याची गरज नाहीखरेदी-विक्री व्यवहार केल्यानंतर त्याची सातबारावर नोंद घेण्यासाठी पूर्वी नागरिकांना तलाठ्याकडे फेºया माराव्या लागत असत. मात्र आता तो त्रास वाचणार आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी-विक्री व्यवहार झाल्यानंतर त्याची नोंद थेट तलाठ्याच्या संगणकीय लॉगइनवर जाईल. तलाठी ती नोंद तपासून इतर हक्की नोंद असल्यास संबंधीतांना नोटीस बजावेल. अन्यथा फेरफार नोंद सातबारावर घेऊन सातबारा अद्यावत करेल. पंधरा दिवसांनी संबंधीत अद्यावत नोंदीसह सातबारा संबंधीतांना आॅनलाईनवरूनही मिळू शकेल. त्यामुळे अडवणुकीचे प्रकार कमी होतील, अशी अपेक्षा आहे.दुय्यम निबंधकांची जबाबदारी वाढणारया सुधारीत प्रणालीत खरेदी-विक्री करणाºयांची ओळख पटविण्याची जबाबदारी दुय्यम निबंधकांवर येणार आहे.