जळगाव : रोटरी क्लब जळगाव इलाइटतर्फे आयोजित २० दिवसीय माेफत बेसिक ब्युटी पार्लर प्रशिक्षण वर्गाला नुकतीच इंडिया गॅरेजवळील इंडिया प्लाझा येथे सुरुवात झाली.
प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ संगीता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी क्लबचे अध्यक्ष नितीन इंगळे, संदीप आसोदेकर, अजित महाजन, मनीषा पाटील, मनीषा खडके, समृद्धी रडे, कविता वाणी, चारू इंगळे, वीणा चौधरी, काजल आसोदेकर आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन वैजयंती पाध्ये यांनी केले.
दरम्यान, हा उपक्रम महिला सबलीकरणासाठी राबविण्यात येत असून, प्रशिक्षण घेऊन महिला स्वत:चा पार्लर सुरू करू शकतात. या स्वयंरोजगारातून महिला आर्थिक स्वावलंबी होऊन त्या इतरांना देखील राेजगार उपलब्ध करून देऊ शकतात, असे मत संगीता पाटील यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले. यावेळी प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.