शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयातून पळविले पुन्हा ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 15:50 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातून सात ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी रात्री साडे दहा वाजता पुन्हा वाळूचे ट्रॅक्टर पळविण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर रविवारी मोहसीन खान अय्युब खान (वय २०, रा.शाहू नगर,जळगाव), शेख शाहीद शेख शब्बीर (वय २९, रा. हुडको, पिंप्राळा) व महेंद्र सुधाकर सपकाळे (वय २७, रा.सावखेडा, ता.जळगाव) या तिघांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देतिघांना अटक  सतत ट्रॅक्टर व डंपर पळविण्यामागे गौडबंगाल काय? सलग तिसरी घटना

 जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयातून सात ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी रात्री साडे दहा वाजता पुन्हा वाळूचे ट्रॅक्टर पळविण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर रविवारी मोहसीन खान अय्युब खान (वय २०, रा.शाहू नगर,जळगाव), शेख शाहीद शेख शब्बीर (वय २९, रा. हुडको, पिंप्राळा) व महेंद्र सुधाकर सपकाळे (वय २७, रा.सावखेडा, ता.जळगाव) या तिघांना अटक करण्यात आली आहे.म्हसावद मंडळाधिकाºयांच्या पथकाने एक ब्रास वाळूसह एक ट्रॅक्टर पकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावले होते. या ट्रॅक्टर मालकाला नोटीसही बजावण्यात आलेली होती, असे असताना शनिवारी रात्री साडे दहा वाजता दोन दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातून ट्रॅक्टर पळवून नेले. हे ट्रॅक्टर व दोन दुचाकी (क्र.एम.एच.१९ टी.५१६५ व एम.एच.१९ सी.डी.१०५१) तलाठी रमेश वंजारी यांना पंचमुखी हनुमान मंदिराच्या पाठीमागे आढळून आले. तेथे मोहसीन, शाहीद व महेंद्र असे तिघं आढळून आले. त्यांना ट्रॅक्टर मालकाचे नाव विचारले असता त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला. याप्रकरणी रात्री तिघांविरुध्द ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी तपासी अमलदार महेंद्र बागुल व सहका-यांनी अटक केली.का घडताहेत वाहने पळविण्याचे प्रकारजिल्हाधिकारी कार्यालय आवारातून सात ट्रॅक्टर पळविल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. त्यानंतर दुसºयाच दिवशी आणखी एक डंपर पळविण्यात आले. त्यानंतर पुन्हा शनिवारी एक ट्रॅक्टर पळविण्यात आले. गुरुवारपासून सलग तीन दिवस वाहने पळविले गेले. जिल्हाधिकारी कार्यालयातून तेही  सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक असताना वाळूचे वाहने पळविले जात असतील तर इतर ठिकाणी वाहने कसे सुरक्षित राहतील. काही महिन्यापूर्वी तहसील कार्यालयातूनही वाहने पळविण्यात आली. वारंवार याच दोन्ही कार्यालयातून वाहने पळविले जात असल्याने कुठे तरी पाणी मुरत असल्याची ओरड होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव