शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भुसावळ बसस्थानकावर सुविधांअभावी प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:49 IST

बसस्थानकावरील बसण्याची बाके गायब झाल्याने ज्येष्ठ नागरिक, प्रवाशांचे हाल होतात. काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून भुसावळ बसस्थानकात बाके लावली गेली होती. मात्र यापैकी अनेक बाक ज्येष्ठ नागरिकांचे, प्रवाशांचे, महिलांचे, विद्यार्थ्यांचे विश्रांतीचे ठिकाण असलेली ही बाके अचानक गायब झालेली आहेत. यासाठी या बसस्थानकावर मूलभूत सुविधा द्याव्यात, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशिवसेनेने आगारप्रमुख बी.एच.भोई यांना दिले निवेदनप्रवाशांना द्या मूलभूत सुविधाअन्यथा करणार आंदोलन

भुसावळ, जि.जळगाव : शहरातील बसस्थानकावरील बसण्याची बाके गायब झाल्याने ज्येष्ठ नागरिक, प्रवाशांचे हाल होतात. काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून भुसावळ बसस्थानकात बाके लावली गेली होती. मात्र यापैकी अनेक बाक ज्येष्ठ नागरिकांचे, प्रवाशांचे, महिलांचे, विद्यार्थ्यांचे विश्रांतीचे ठिकाण असलेली ही बाके अचानक गायब झालेली आहेत. यासाठी या बसस्थानकावर मूलभूत सुविधा द्याव्यात, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.भुसावळ स्थानकात पंधरा मिनिटाला एक बस येत असते. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने बस फेऱ्या निश्चितच वाढतील आणि प्रवाशीसुद्धा वाढतील. अनेक महिन्यांपासून या समस्येचा त्रास येथील ज्येष्ठ नागरिक आणि प्रवासी सहन करीत आहेत, अशा तक्रारी ज्येष्ठ नागरिकांनी, महिलांनी, विद्यार्थ्यांनी, प्रवाशांनी भुसावळ शिवसेनेकडे केल्या होत्या. बसस्थानकावर सुट्टीच्या काळात प्रवाशांची गर्दी होत असली तरी त्यांना सुविधा देण्यात भुसावळ आगार अपयशी ठरले आहे.शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पाहणी केली असता काही बाबी निदर्शनास आल्या. बसण्यासाठी अपुरी जागा आहे. यामुळे जाहिरात फलकाखाली प्रवासी गर्दी करतात. अस्वच्छता असल्यामुळे परिसरात सुटलेली दुर्गंधी, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, कचरा पेटवल्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास, गुरे, ढोरे, कुत्रे लोळलेली, तंबाखू व घुटक्यांनी भिंती रंगवलेल्या असे चित्र सध्या भुसावळ बसस्थानकावर आहे.आता दसरा आणि दिवाळी सुरू होणार असल्यामुळे शहरातील भुसावळ बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी होत आहे. परंतु भुसावळ बसस्थानकांवर प्रवाशांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. या बसस्थानकावर पिण्याची पाण्याची सोय नसल्याने प्रवाशांना आपली तहान भागविण्यासाठी परिसरात असणाºया हॉटेलमधील पाण्याचा आधार घ्यावा लागतो. तसेच प्रवाशांना बसस्थानकामध्ये बसण्यासाठी करण्यात आलेली व्यवस्थाही अपुरी आहे. यामुळे अनेक प्रवाशांना गाडीची वाट पाहत तासनतास उन्हामध्ये उभे राहावे लागते.महिला कर्मचाºयांनाही बैठकीची स्वतंत्र व्यवस्था नाही, त्यांच्यासाठी स्वतंत्र सुविधा का नाही, असा सवाल तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी केला.त्यामुळे निदान सुट्टीच्या व गर्दीच्या हंगामामध्ये बसस्थानकावर महामंडळाने तरी दिवाळी सुरू होण्याआधी सुविधा द्याव्यात, अशी मागणी शिवसेना भुसावळ शहरप्रमुख बबलू बºहाटे यांच्या वतीने करण्यात आली.अन्यथा शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, विधानसभा क्षेत्र संघटक नीलेश सुरळकर, उपतालुका प्रमुख मनोहर बारसे, शहर प्रमुख (दक्षिण विभाग) बबलू बºहाटे, शहर प्रमुख (उत्तर विभाग) नीलेश महाजन, शहर संघटक योगेश बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आलेला आहे.प्रसंगी शिक्षकसेनेचे जिल्हा प्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, शहर संघटक सुनील बागले, उपशहर प्रमुख अन्सार शाह, उपशहर प्रमुख घनश्याम ठाकूर, उपशहर प्रमुख राकेश खरारे, उपशहर संघटक नबी पटेल, उपशहर संघटक प्रसिद्धी प्रमुख दत्तू नेमाडे, अबरार ठाकरे, अखतर खान, हेमंत बºहाटे, विकास खडके, नितीन पाटील, रिझवान रहीम, सद्दाम शेख, सुरज पाटील, भूषण कोळी, फिरोज तडवी, शेख नजीर, ग्राहक संरक्षक शहरप्रमुख मनोज पवार, अल्पसंख्याक विभाग शहर प्रमुख शेख मेहमूद, राकेश चौधरी, निखिल बºहाटे, चेतन वाघ, जावेद जाफर, दीपक जाधव, रितेश राणे, सनी जोहरे, हर्षल पाटील, राहुल सावकारे, रवी केतवाझ, रोहित नागदेव उपस्थित होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणBhusawalभुसावळ